शैक्षणिक, वसतिगृह शुल्क कमी करा; कृषी विद्यापीठ विद्यार्थ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 03:14 PM2020-02-17T15:14:45+5:302020-02-17T15:15:00+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रविवार, १६ फेब्रुवारी रोजी कृषी विद्यापीठ प्रशासन कार्यालयावर धडक दिली.
अकोला : राज्याच्या कृषी विद्यापीठात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व वसतिगृह शुल्क अमाप वाढविल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. शुल्क माफ करू न विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रविवार, १६ फेब्रुवारी रोजी कृषी विद्यापीठ प्रशासन कार्यालयावर धडक दिली. यामुळे कृषी अधिकाºयांची एकच धावपळ झाली. कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांना विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन चर्चा केली. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन कुलगुरूं नी विद्यार्थ्यांना दिले.
राज्यातील तीन कृषी विद्यापीठांसह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिक्षण घेणारे जवळपास विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत. याचा विचार न करता महाराष्टÑ राज्य (एमसीईएआर) कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक शुल्क वाढविले आहे. वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना प्रति सत्र दोन हजार रुपये शुल्क द्यावे लागत होते. आता या शुल्कात प्रति सत्र ६ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. एवढ्यावरच हे थांबले नाही, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. कृषी पदव्युत्तर शिक्षणाचा व्यावसायिक दर्जा रद्द करण्यात आला आहे. हा दर्जा देण्यात यावा तद्वतच सर्वच समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करण्यात यावी, प्रबंध पडताळणी शुल्क माफ करावे, निर्वाह भत्ता योजना चालूच ठेवावी, ग्रंथालय शुल्क बंद करू न, वेळ वाढवून द्यावी, मागणीनुसार एक महिन्यात पुस्तके उपलब्ध करू न द्यावी, अभ्यास कक्ष सुरू ठेवण्यात यावा, मागण्या मान्य होईपर्यंत अगोदर नोंदणी तारीख पुढे ढकलून विलंबासाठी दंड आकारू नये, आदी मागण्यांसंदर्भात विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांनी प्रशासनाला लेखी मागितले; परंतु ते न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नारजीचा सूर होता.
विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या बाजूनेच आहे. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती जेमतेम आहे, त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात काम उपलब्ध करू न देण्याचा प्रयत्न करू .
- डॉ. व्ही. एम. भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंदेकृवि, अकोला.