मनपाची करवाढ एक महिन्यात कमी करू - पालकमंत्र्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:33 PM2019-01-28T12:33:01+5:302019-01-28T12:33:58+5:30
अकोला: महापालिकेने आकारलेल्या सुधारित करवाढीच्या संदर्भात प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करून एक महिन्यात करवाढ कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.
अकोला: महापालिकेने आकारलेल्या सुधारित करवाढीच्या संदर्भात प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करून एक महिन्यात करवाढ कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर भारिप-बहुजन महासंघाने अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.
मनपा प्रशासनाने सत्ताधारी भाजपाच्या मदतीने अकोलेकरांवर अवाजवी करवाढ लादली असून, ती कमी करण्याची मागणी मनपातील भारिप-बमसंने लावून धरली आहे. पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करवाढीच्या मुद्यावर आंदोलन छेडत शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मनपातील आर्थिक अनियमितता व शासन निधीच्या दुरुपयोगाची शासनाने चौकशी करण्याची मागणी करीत भारिप-बमसंच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मनपातील गटनेत्या अॅड. धनश्री देव, नगरसेविका किरण बोराखडे, महानगर अध्यक्ष वंदना वासनिक यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जठारपेठ चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सायंकाळी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करून भारिप-बमसंने उपस्थित केलेल्या करवाढीसह इतर मागण्यांवर योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यावेळी डॉ. पाटील, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ज्युस घेतल्यानंतर उपोषणकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, नगरसेवक बबलू जगताप, प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, माजी जि.प. अध्यक्ष बालमुकुंद भिरड, पुष्पा इंगळे, शंकरराव इंगळे, सीमांत तायडे, दीपक गवई, शोभा शेळके, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई, सुवर्णा जाधव, बुद्धरत्न इंगोले, किरण पळसपगार, मनोहर पंजवाणी, अमोल सिरसाट, अॅड. संतोष राहाटे, पराग गवई, आशिष मांगुळकर, जय तायडे, सचिन शिराळे, सुनील इंगळे, सुनील पाटील, संदेश तायडे, किशोर वानखडे, प्रतिभा अवचार, राजू दहातोंडे, शेख सलीम, शेख खुदबी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.