रिफाइंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:24 AM2021-08-18T04:24:48+5:302021-08-18T04:24:48+5:30

अशुद्ध घटक काढून टाकण्यासाठी रिफाइंड तेलावर मोठी रासायनिक प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे शरीरातील ‘बॅड कोलेस्टेरॉल’ वाढते आणि हृदयाशी संबंधित ...

Refined increases fat; Demand for crude oil rises! | रिफाइंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली!

रिफाइंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली!

Next

अशुद्ध घटक काढून टाकण्यासाठी रिफाइंड तेलावर मोठी रासायनिक प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे शरीरातील ‘बॅड कोलेस्टेरॉल’ वाढते आणि हृदयाशी संबंधित विकारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये लाकडी घाण्याच्या तेलाची मागणी वाढली आहे. शहरात लाकडी घाण्याची दुकाने पाहायला मिळत आहेत. घाण्यावर काढलेल्या तेलात ‘गुड कोलेस्टेरॉल’ अधिक असल्याचे सांगितले जाते. मात्र, जाहिराती आणि ‘ट्रेंड’ला न भुलता योग्य तेलाची निवड करणे आवश्यक ठरते.

रिफाइंड तेल घातक का?

अनेक प्रकारचे घातक केमिकल्स वापरल्याशिवाय रिफाइंड तेल तयार होत नाही.

सिंगल रिफाइंडसाठी गॅसोलिन, सिंथेटिक अँटिऑक्सिडंटस्, हेक्सेन, अशा प्रकारची केमिकल्स वापरली जातात.

रिफाइंड तेलाला चिकटपणा नसतो. कारण त्यातले फॅटी अ‍ॅसिड आधीच बाहेर काढले जातात.

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

राज्यात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लठ्ठपणा आणि चुकीचा आहार ही त्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. या दोन्ही गोष्टी टाळायच्या असतील, तर आहारात शुद्ध तेलाचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

घाण्याचे तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. तेलबियांवर जास्त दाब देऊन हे तेल काढले जाते. घाणा एका मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो. तेलबियांतील एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. रिफाइंड तेलाला पर्याय म्हणून घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी

शुद्ध तेलाचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक असलेला हायडेन्सिटी लिपोप्रोटीन हा घटक लिव्हरमध्ये तयार होतो. आहारात शुद्ध तेलाचाच समावेश असावा. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो. हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, सांधेदुखी, अर्धांगवायू, मेंदूचे आजार, उच्च रक्तदाब, अशा गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी असल्याचे आहारतज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: Refined increases fat; Demand for crude oil rises!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.