हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरू, जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला १० ऑक्टोबरपासून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 09:14 PM2024-10-02T21:14:30+5:302024-10-02T21:14:36+5:30
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत २०२४-२५ या हंगामात नाफेडअंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन खरेदीला मान्यता देण्यात आली आहे.
अकोला : खरीपातील मूग, उडीद आणि सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी पणन महासंघातर्फे नाफेडअंतर्गत खरेदीसाठी जिल्ह्यातील नऊ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली असून, १० ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी १३ लाख टनापेक्षा अधिकचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत २०२४-२५ या हंगामात नाफेडअंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाने पणन महासंघाची नोडल एजेन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार नाफेडच्या वतीने राज्यामध्ये पणन महासंघातर्फे मगू, उडीद, सोयाबीन खरेदी सुरू करण्यात येत आहे. १० ऑक्टोबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ पर्यंत खरेदी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी १ ऑक्टोबरपासून नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. खरेदीसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
असे असेल खरेदी उद्दिष्ट
वान दर प्रति क्विंटल खरेदी उदिष्ट (मे.टन)
मूग : ८६८२ : १७,६८८
उडीद : ७४०० १,०८,१२०
सोयाबीन : ४८९२ १३,०८,२३८