नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर कर्जमाफीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:33 PM2019-06-07T12:33:47+5:302019-06-07T12:33:52+5:30
कार्ली (वाशिम) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाºया कार्ली परिसरातील जवळपास १५० ते २०० शेतकºयांना अद्याप प्रोत्साहनपर कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कार्ली (वाशिम) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाºया कार्ली परिसरातील जवळपास १५० ते २०० शेतकºयांना अद्याप प्रोत्साहनपर कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. दीर्घ प्रतिक्षेनंतर प्रोत्साहनपर रक्कम मिळत नसल्याने शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
मे व जून २०१७ या महिन्यात पीक कर्जमाफीसाठी विविध टप्प्यात आंदोलने झाल्याने राज्य सरकारने जून महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१७ अखेर थकबाकीदार शेतकºयांना १ लाख ५० हजार पर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार वरील शेतकºयांना वनटाईम सेंटलमेंट योजना लागू केली तसेच २०१५-१६- २०१६-१७ या वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली अशा श्ोतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार पर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याचे घोषीत केले. कार्ली परिसरातील ४०० पेक्षा अधिक शेतकरी या प्रोत्साहन लाभासाठी पात्र आहेत. नियमित कर्जफेड करणाºया सर्वच शेतकºयांना आतापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम मिळणे अपेक्षीत होते. सर्व प्रशासकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतरही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रोत्साहनपर रक्कम मिळत नसल्याने शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. कार्ली परिसरातील किनखेडा, तोरनाळा, काटा, सोयता, भोयता, सावंगा जहॉगीर, सुराळा आदी गावातील जवळपास १५० ते २०० शेतकºयांना प्रोत्साहनपर कर्जमाफीची प्रतिक्षा आहे. कर्जमाफीची घोषणा होऊन दोन वर्षाचा कालावधी उलटला असतानाही प्रोत्साहनपर रक्कम न मिळाल्याने संबंधित बँकांबरोबरच संबंधित यंत्रणेची दप्तरदिरंगाई चव्हाट्यावर येत आहे. कर्जाचा नियमित भरणा करणाºया शेतकºयांची बाब शासन व प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही कार्ली परिसरातील शेतकºयांनी केला. जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच जिल्हा अग्रणी बँकेने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी शुक्रवारी केली.
आम्ही पीककर्जाची नियमित परतफेड करतो. प्रोत्साहनपर कर्जमाफीसाठी पात्र ठरलो. मात्र, अद्याप आम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नाही.
- व्दारकाबाई घमराव देशमुख
कार्ली ता. जि. वाशिम
नियमित कर्जफेड करीत असल्याने प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलो. परंतू, अजूनही प्रोत्साहनपर रक्कम मिळाली नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षीत आहे.
- मनोहर महाजी वानखेडे
कार्ली, ता. जि. वाशिम