गायरानावरील शेतीचे अतिक्रमण नियमाकूल करा; समता संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण  

By संतोष येलकर | Published: October 10, 2023 06:04 PM2023-10-10T18:04:30+5:302023-10-10T18:04:44+5:30

भूमिहीन शेतकऱ्यांनी गायरानावर शेतीसाठी केलेले अतिक्रमण नियमानुकूल करून अतिक्रमित वहितीच्या शेतातील पिके उद्ध्वस्त करण्यात येऊ नये, अशी मागणी करीत समता संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.

Regulate agricultural encroachment on Gairana Indefinite hunger strike of Samata Sangathan in front of Collector's Office | गायरानावरील शेतीचे अतिक्रमण नियमाकूल करा; समता संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण  

गायरानावरील शेतीचे अतिक्रमण नियमाकूल करा; समता संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण  

अकोला: भूमिहीन शेतकऱ्यांनी गायरानावर शेतीसाठी केलेले अतिक्रमण नियमानुकूल करून अतिक्रमित वहितीच्या शेतातील पिके उद्ध्वस्त करण्यात येऊ नये, अशी मागणी करीत समता संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. गायरान जमिनीवर शेती प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे, भूमिहीन शेतकऱ्यांच्या अतिक्रमित शेतातील पिके उद्ध्वस्त करण्याची कार्यवाही थांबविण्यात यावी, भूमिहीन शेतकरी वहिती करीत असलेल्या शेतीवर सौरऊर्जेचा प्रकल्प न घेता विनावापर जमिनीवर घेण्यात यावा आदी मागण्यांसाठी समता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. 

समता संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आम्रपाल वाघमारे, विदर्भ अध्यक्ष अनिल चिंचे यांच्यासह उत्तम जाधव, मयूर मोरे, बाळू दांडगे, विश्वनाथ गवई, महादेव तायडे, रेखा सपकाळ, सुशीला इंगळे, वर्षा तायडे, सुकेशिनी तायडे, फारुख अहमद, मनोहर गावंडे, देवानंद शिरसाट, संतोष धामोळे आदी भूमिहीन शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
 

Web Title: Regulate agricultural encroachment on Gairana Indefinite hunger strike of Samata Sangathan in front of Collector's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला