कासोदचे अतिक्रमण नियमाकुल करा; समाज क्रांती आघाडीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:51 AM2021-02-20T04:51:14+5:302021-02-20T04:51:14+5:30
अकोट राजस्व प्रशासनाकडून पुनर्वसनाच्या नावाखाली सदर लोकांना हटविण्याची कार्यवाही २०१७ मध्ये सुरु केली होती. हायकोर्टाने प्रशासनाच्या कार्यवाहीला स्थगिती दिल्याने ...
अकोट राजस्व प्रशासनाकडून पुनर्वसनाच्या नावाखाली सदर लोकांना हटविण्याची कार्यवाही २०१७ मध्ये सुरु केली होती. हायकोर्टाने प्रशासनाच्या कार्यवाहीला स्थगिती दिल्याने लोकांची घरे सुरक्षित राहिली मात्र अजूनपर्यंत शासनाच्या कायद्यानुसार प्रशासनाकडून अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबतची कार्यवाही केली जात नाही. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी ६/१२/२०१७ रोजी एका पत्राद्वारे उपविभागीय अधिकारी अकोट यांचेकडे अतिक्रमण नियमाकुल करण्याचे निर्देश दिले होते मात्र एसडीओंनी कोणतीही कार्यवाही केली नाही याकडे समाज क्रांती आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. येत्या १५ दिवसांच्या आत प्रशासनाकडून अतिक्रमण नियमाकुलबाबत कार्यवाही सुरु झाली नाही तर आंदोलन छेडले जाईल असा इशारा सुद्धा याप्रसंगी देण्यात आला. शिष्टमंडळामध्ये समाज क्रांती आघाडीचे बंडूभाऊ वानखडे, शावकार पहेलवान, यशपाल चांदेकर, सुरेश डुडवे, कृष्णा चव्हाण, संजय इंगळे इत्यादींची उपस्थिती होती.