लाेकमत रक्ताच्या नात्यातून मानवतेशी नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:22 AM2021-07-14T04:22:20+5:302021-07-14T04:22:20+5:30
अकोला: रक्तदान हे श्रेष्ठदान असून, लोकमत समूहाने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केलेला रक्तदानाचा महायज्ञ मानवतेशी नातं जोडणारा आहे, असे ...
अकोला: रक्तदान हे श्रेष्ठदान असून, लोकमत समूहाने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केलेला रक्तदानाचा महायज्ञ मानवतेशी नातं जोडणारा आहे, असे प्रतिपादन अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर यांनी केले.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकमत समूहाचे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत इन्कम टॅक्स चौकात सोमवारी आयाेजित रक्तदान शिबिरात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. उदघाटन अकाेला वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरात २७ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. शासकीय रुग्णालय रक्तपेढीच्या चमूने रक्त संकलन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, उद्योजक सुनील इन्नानी, नाट्यकर्मी प्रा. मधू जाधव, समाजसेवक सुगत वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते अजय गावंडे, संत गाडगेबाबा सेवा समितीचे संयोजक निशिकांत बडगे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश जाधव, समता परिषदेचे अध्यक्ष सदाशिव शेळके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माया इरतकार, युवा राष्ट्रचे डॉ. निलेश पाटील, संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले, आनंद वानखडे, फोर प्लस ग्रुपचे नरेंद्र चिमणकर, अ. भा. वऱ्हाडी साहित्य मंचचे श्याम ठक, अंनिसचे चंद्रकांत झटाले यांची प्रमुख उपस्थिती होती. रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी रक्त हे संजीवनी ठरते. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारी ओळखून रक्तदान करावे, असे आवाहन अकोला वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी केले. सूत्रसंचालन जागर फाउंडेशनचे संयोजक तुलसीदास खिरोडकर यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत गाडगेबाबा सेवा समितीचे मयूर जोशी, देवा भगत, रोहित रुंगटा, निशांत जाधव, अंकित शंके, नितीन राऊत, मनीष मुराई, राधा जोशी, विष्णुदास मोंडोकार, अनिल चव्हाण, प्रशांत प्रधान यांनी परिश्रम घेतले.
----------------------------
रक्तदानात महिलांचा पुढाकार
शिबिरात महिलांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला. गोरक्षण रोड परिसरातील महिलांनी रक्तदान महायज्ञात सहभाग नाेंदविला.