आचारसंहिता शिथिल करा! - आ. रणधीर सावरकर यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 02:35 PM2019-04-28T14:35:36+5:302019-04-28T14:35:44+5:30
लोकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली.
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासह लोकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया गत १८ एप्रिल रोजी पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यात सध्या उष्णतेचा जोर वाढला असून, पाणी व चाराटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. रस्ते व इतर विकासाची कामेदेखील पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे; परंतु आचारसंहिता लागू असल्याने मंजूर असलेली विकासाची कामे पूर्ण करण्यासह लोकांच्या समस्यांसंदर्भात शासकीय यंत्रणांसोबत बैठक घेणे व पाठपुरावा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शिथिल करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे कळविण्यात यावे, अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे पत्राद्वारे केली आहे.