सूक्ष्म अर्थशास्त्र पुस्तकाचे विमोचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:19 AM2021-07-31T04:19:50+5:302021-07-31T04:19:50+5:30
----------------- झेडपीच्या उद्यानात वाढले गवत अकोला: जिल्हा परिषद मुख्यालय परिसरात असलेल्या उद्यानात पावसामुळे गवताची वाढ झाली आहे. यामुळे उद्यानाचे ...
-----------------
झेडपीच्या उद्यानात वाढले गवत
अकोला: जिल्हा परिषद मुख्यालय परिसरात असलेल्या उद्यानात पावसामुळे गवताची वाढ झाली आहे. यामुळे उद्यानाचे साैंदर्यही दिसेनासे झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
-------------
मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा
अकोट : शहरातील मोकाट कुत्रे तसेच जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
---------------
वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
बाळापूर : शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांनी विविध योजनांद्वारे शेतकुंपण तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असून सोयाबीन कापूस आदी पिके शेतात उभी आहेत. वन्यप्राणी नुकसान करीत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जाते.
---------------
सौरदिवे नादुरुस्त, दुरुस्तीची
तेल्हारा : तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु, अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे निकामी झाले.
---------------
कचरा व्यवस्थापन करा
बार्शीटाकळी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात.
-------------------
औद्योगिक वसाहत केवळ नावापुरतीच
पातूर : तालुक्यातील देऊळगाव नजीक असलेली औद्योगिक वसाहत केवळ नावापुरतीच असून, येथे उद्योग सुरूच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील बेरोजगारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
---------------
चतारी येथील आरोग्य केंद्राची दुरवस्था
पातूर: तालुक्यातील चतारी येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून, संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
--------------------