‘टेरा इंडिया’ ई- वार्तापत्राचे कुलगुरु भाले यांच्या हस्ते विमोचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:16 PM2018-06-21T14:16:36+5:302018-06-21T14:16:36+5:30
अकोला : निसर्ग शिक्षण देणाऱ्या ई.एफ. ई. सी. या संस्थेतर्फे टेरा इंडिया या ई-वार्तापत्राचे विमोचन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या हस्ते बुधवार, २० जून रोजी करण्यात आले.
अकोला : निसर्ग शिक्षण देणाऱ्या ई.एफ. ई. सी. या संस्थेतर्फे टेरा इंडिया या ई-वार्तापत्राचे विमोचन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या हस्ते बुधवार, २० जून रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध विषयावंर चर्चा झाली. या प्रसंगी डॉ. भाले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दर महिन्याला प्रकाशीत होणारे हे वार्तापत्र एक उत्कृष्ट शैक्षणिक संदर्भ ग्रंथ असल्याचे सांगत हे वार्तापत्र लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्व विषद करेल, असे कुलगुरु भाले म्हणाले.
या प्रकाशन सोहळ्याला शास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी, रोटरी क्लब, विदर्भ एरोमॉडेलिंग आणि कृषी मित्र परिवार आदी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ई.एफ.ई.सी. या संस्थेचे सभासदत्व लहानांपासून मोठ्यापर्यंत कुणालाही मिळविता येईल, अशी घोषणा यावेळी उदय वझे यांनी केली. संचालन रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप दोषी यांनी, तर आभार प्रदर्शन गिरीश नानोटी यांनी केले. आयोजनासाठी नेहरु तारापोरवाला आणि देवेंद्र तेलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
काय आहे ई.एफ.ई.सी.
विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांना हसत खेळत निसर्ग शिक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने ई.एफ.ई.सी. संस्थेची स्थापना झाली आहे. पुस्तकी शिक्षणाबरोबरच खुल्या आसमंतात निसर्ग अनुभवत घेतलेले शिक्षण तेवढेच महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणारे निसर्ग शिक्षण अधिक मनोरंजनात्मक करण्यासाठी ई.एफ.ई.सी. कटीबद्ध आहे.