‘रिलायन्स जिओ’चे उपकरण लंपास!
By admin | Published: June 1, 2017 01:40 AM2017-06-01T01:40:35+5:302017-06-01T01:40:35+5:30
अकोला : रिलायन्स जिओ कंपनीचे दोन उपकरणे अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २० मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी मंगळवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रिलायन्स जिओ कंपनीचे दोन उपकरणे अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २० मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी मंगळवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. चोरीस गेलेल्या उपकरणांची किंमत सात लाख रुपये आहे.
मलकापूर परिसरातील गुरुकुल नगरीत राहणारे अमित विश्वासराव राऊत (३०) यांच्या तक्रारीनुसार, ते रिलायन्स जिओ कंपनीमध्ये सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. राऊत हे शैलेश चौखंडे यांच्या डुप्लेक्समध्ये भाड्याने राहतात. त्यांच्या घरामध्ये त्यांनी रिलायन्स जिओ कंपनीचे फोर-जी जिओचे टॉवर सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे टेन-जी उपकरण ठेवले होते. संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून दोन उपकरणे चोरून नेले. राऊत यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास केला. त्यानंतर खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.