व्हॉट्स अँपच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या!

By Admin | Published: February 10, 2016 02:16 AM2016-02-10T02:16:56+5:302016-02-10T02:16:56+5:30

कामठी येथील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल.

Religious feelings hurt through the What's Apes! | व्हॉट्स अँपच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या!

व्हॉट्स अँपच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या!

googlenewsNext

अकोला: व्हाट्सअँपवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त मजकूर टाकून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी मंगळवारी दुपारी कामठी येथील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. कृषिनगर परिसरातील न्यू भीमनगरात राहणारे सूरज बाळू गोडबोले व सतीश देवानंद यांच्या तक्रारीनुसार, व्हाट्सअँपवरील ह्यबॅड बॉईजह्ण नावाचा ग्रुप तेजस नामक व्यक्तीने तयार केला असून, त्याचा अँडमिन सुनील नराटे हा आहे. नराटे यानेच सूरज गोडबोले याला बॅड बॉईज ग्रुपवर अँड केले आहे. या ग्रुपवरील सदस्य असलेला कामठी येथील स्वप्न ढोके याने सतीश डेरे याने टाकलेला मजकुरावर उत्तर देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त मजकूर टाकून धार्मिक दुखावल्या. त्यामुळे स्वप्न ढोके याच्यावर अट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

Web Title: Religious feelings hurt through the What's Apes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.