मुख्य रस्त्यालगतची धार्मिक स्थळे भुईसपाट

By Admin | Published: May 3, 2017 01:10 AM2017-05-03T01:10:23+5:302017-05-03T01:10:23+5:30

अकोला : शहराच्या विविध भागात मुख्य रस्त्यालगत उभारलेल्या तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली.

Religious sites on the main street Bhuiyan Pattat | मुख्य रस्त्यालगतची धार्मिक स्थळे भुईसपाट

मुख्य रस्त्यालगतची धार्मिक स्थळे भुईसपाट

googlenewsNext

अकोला : शहराच्या विविध भागात मुख्य रस्त्यालगत उभारलेल्या तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली. अतिक्रमण हटविताना मनपाच्या पथकाने भेदभाव केल्याचा आरोप पश्चिम झोनमधील डाबकी रोड परिसरातील व्यावसायिकांनी केला.
शहरातील मुख्य रस्त्यांची दुरुस्ती व रुंदीकरणाची कामे महापालिका प्रशासनाने सुरू केली आहेत. मुख्य रस्त्यालगत दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांनी दुकानांच्या समोर अनधिकृतपणे धार्मिक स्थळे उभारली. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होण्यासह साफसफाईच्या कामांना अडथळा सुरू झाला.
यासंदर्भात मनपाच्या सभागृहात नगरसेवकांनी पोटतिडकीने समस्या मांडल्या होत्या. त्याची दखल घेत महापौर विजय अग्रवाल यांनी अतिक्रमणाची समस्या दूर करण्याचे निर्देश अतिक्रमण विभागाला दिले होते. त्या पृष्ठभूमीवर मंगळवारी विविध झोनमधील अतिक्रमणासह रस्त्यालगतच्या धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे, राजेंद्र घनबहादूर, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, नरेश बोरकर व कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

या भागातील स्थळे जमीनदोस्त
पश्चिम झोन अंतर्गत येणाऱ्या कॅनॉलपासून ते राजकमल हॉटेलपर्यंत व्यावसायिकांनी रस्त्यालगत उभारलेले अतिक्रमण तसेच धार्मिक स्थळ धाराशाही करण्यात आले. उत्तर झोनमध्ये तार फैल, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील धार्मिक स्थळ, मनकर्णा प्लॉट, बीएसएनल आॅफिससमोर तसेच अकोट फैल पोलीस ठाण्यालगतचे धार्मिक स्थळ हटविण्यात आले.

Web Title: Religious sites on the main street Bhuiyan Pattat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.