दहा दिवसात कावड-पालखी मागार्ची दुरूस्ती करा - जिल्हाधिका-यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 04:16 PM2019-08-10T16:16:14+5:302019-08-10T16:17:11+5:30
गांधीग्राम ते अकोला मार्गाची वाट लागल्याने पायी चालत कावड किंवा पालखी आणणे शक्य नाही.
अकोला: यंदा कावड पालखी महोत्सवाचे ह्लअमृत महोत्सवीह्व वर्ष आहे. गांधीग्राम येथील पुर्णा नदीच्या जलाने राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याच्या परंपरेला ७५ वर्ष पुर्ण होत आहेत. मात्र गांधीग्राम ते अकोला मार्गाची वाट लागल्याने पायी चालत कावड किंवा पालखी आणणे शक्य नाही. त्यामुळे कावड व पालखी मागार्ची दुरूस्ती करण्यासाठी प्रदेश कॉंग्रेस कमिटी महासचिव मदन भरगड यांनी जिल्हाधिका-यांना ८ आॅगस्ट रोजी निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिका-यांनी शनिवार, १० आॅगस्ट रोजी नियोजन भवनात सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, दहा बैठकीत दिवसाच्या आत कावड पालखी मागार्ची दुरूस्ती करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत माजी महापौर मदन भरगड यांनी पालखी मागार्ची झालेली दूरवस्था व शिवभक्तांना होणा-या त्रासाची प्रशासनाला जाणीव करून दिली. पालखी व कावड महोत्सवात संगिताचे अनन्य साधारण महत्व असल्याने साऊंड सिस्टीमला परवानगी देण्याची विनंती केली. साऊंड सिस्टीम वाजविण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक यांनी साठी स्वातंत्र बैठक करून हा प्रश्न मार्गी लावणार आहे, असे आश्वासन दिले आहे.
त्याचप्रमाणे या मार्गावर विद्युत रोषणाई व साफ सफाई करण्याची मागणी केली. उपस्थित सा.बा. विभागाच्या अधिका-यांनी यापूवीर्ही अशाच प्रकारे आठ दिवसात पालखी मार्गाच्या दुरूस्तीचे आश्वासन दिले होते. ते अद्यापही पुर्ण झालेले नाही त्यामुळे दहा दिवसाच्या आत मागार्ची दुरूस्ती करून २१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिका-यांसमवेत मदन भरगड व शिवभक्त तसेच संबधीत विभागांचे अधिकारी पाहणी करणार आहेत. या सभेला शहरातील सर्व शिवभक्त मंडळांच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकत्यां सह उपस्थित होते. मनपा आयुक्त,पोलीस अधिक्षक, अधिक्षक अभियंता, सा.बा. विभाग, कार्यकारी अभियंता सा. बा. विभाग, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, कार्यकारी अभियंता विद्युत वितरण, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.