शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे रद्द करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:18 AM2021-03-06T04:18:40+5:302021-03-06T04:18:40+5:30
अकोला : केंद्र सरकारने पारित केेलेल्या शेतकरी विरोधी तीन कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत, शेतकरी विरोधी ...
अकोला : केंद्र सरकारने पारित केेलेल्या शेतकरी विरोधी तीन कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत, शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथे गेल्या शंभर दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत; परंतु यासंदर्भात सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सरकारने शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे रद्द करून, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप वानखडे, प्रमोद देंडवे, ज्ञानेश्वर सुलताने, प्रतिभा भोजने, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, शोभा शेळके, दीपक गवई, दिनकर खंडारे, गजानन गवइ, विकास सदांशिव, वसंतराव नागे,पराग गवई, किशोर जामनिक, मंदा वाकोडे, मंगला शिरसाट, उमा अंभोरे, माधुरी हिवराळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
..................फोटो........................