‘काटेपूर्णा’तून पुन्हा विसर्ग!
By admin | Published: October 9, 2016 02:54 AM2016-10-09T02:54:39+5:302016-10-09T02:54:39+5:30
महान धरणाचे दोन गेट अर्धा फुटाने उघडून अतिरिक्त १0 पाइंट जलसाठा नदीपात्रात विसजिर्त करण्यात आला.
Next
महान (जि. अकोला), दि. 0८- मागील दोन दिवसांपासून मालेगाव, जऊळका, काटाकोंडाळा, अमरवाडी, मुसळवाडी, धनोरा या भागात हलका पाऊस झाल्याने धरणाच्या जलसाठय़ात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता जलसाठा ११४१.१0 फूटवर पोहोचला होता. त्यामुळे सकाळी ६.३0 वाजता महान धरणाचे दोन गेट अर्धा फुटाने उघडून अतिरिक्त १0 पाइंट जलसाठा नदीपात्रात विसजिर्त करण्यात आला.
साडेपाच तासांपर्यंत धरणाचे गेट उघडण्यात आले व दुपारी १२ वाजता जलसाठा ११४१ फुटावर आल्याने दोन्ही गेट बंद करण्यात आले.