‘रेमडेसिविरची जादा दराने विक्री झाल्यास तक्रार करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:18 AM2021-04-20T04:18:47+5:302021-04-20T04:18:47+5:30
जिल्हा परिषद विभागप्रमुखांची बैठक अकोला : जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागप्रमुखांची आढावा बैठक सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी ...
जिल्हा परिषद विभागप्रमुखांची बैठक
अकोला : जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागप्रमुखांची आढावा बैठक सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी सौरभ कटियार यांनी घेतली. त्यामध्ये जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना व विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहीम सुरू!
अकोला : जिल्ह्यातील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहीम जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या दोन पथकांमार्फत राबविण्यात येत आहे. गावागावांत जाऊन थकीत पाणीपट्टीची रक्कम वसूल करण्यात येत आहे.
गोडबोले उद्यानात पक्ष्यांकरिता जलपात्र
अकोला : जानकी वल्लभो मातृशक्ती जागरण सत्संग मंडळ तसेच श्री रामनवमी शोभायात्रा समिती आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने गोडबोले उद्यानात पक्ष्यांकरिता जलपात्र लावण्यात आले. समितीचे अध्यक्ष विलास अनासने सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा, गिरीराज तिवारी, अनिल मानधने, गिरीश जोशी, पुष्पा वानखडे यांच्या नेतृत्वात कल्पना अडचुळे, वर्षा आखरे, मंदा कुटे, सोनल शर्मा, विठाळे ताई, सोनल मिसळकर, रेखा नालट, निशा रोठे, दुर्गा जोशी, संतोष शर्मा, सुजाता वानखडे, मनीषा भुसारी, मीरा वानखडे, सारिका देशमुख, मालती रणपिसे व परिसरातील महिलांनी यासाठी पुढाकार घेतला.
फाेटाे आहे ..........
रामनवमीनिमित्त धार्मिक विधी
अकोला : जुन्या मोठ्या राममंदिरात रामनवमीनिमित्त पूजाअर्चा सुरू करण्यात आली आहे. काेराेना नियमांमुळे सर्वसामान्य भक्तांना प्रवेशबंदी असून, परंपरा संस्कृती अंतर्गत प्रतीकात्मक पूजा सुरू आहे. सोनल अग्रवाल, मनोज अग्रवाल यांनी पूजाअर्चा केली तर राधा कृपा सत्संग मंडळ यांनी राम अमृतवाणीचे वाचन केले. यावेळी अमरचंद जोशी, किसन गोपाल, पुरोहित संजय खटोड, नारायण गोरखा, अशोक छानगाणी, दिलीप छानगाणी, बबलू सावना, बिमाल शर्मा, महादेव वानरे उपस्थित हाेते.
फाेटाे आहे
.......................................................