तपासणी समितीच्या अहवालात अकोला शहर हगणदरीमुक्त

By admin | Published: July 2, 2017 09:31 AM2017-07-02T09:31:32+5:302017-07-02T09:31:32+5:30

‘स्वच्छ भारत’ अभियानाचे दोन्ही टप्पे पूर्ण

In the report of the inspection committee, Akola city is located in Hagar | तपासणी समितीच्या अहवालात अकोला शहर हगणदरीमुक्त

तपासणी समितीच्या अहवालात अकोला शहर हगणदरीमुक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला:स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहरातील नागरिकांना वैयक्तीक शौचालय बांधून दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी अकोलेकरांमध्ये जनजागृती अभियान राबवले. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले असून, राज्य शासनाच्या तपासणी समितीने केलेल्या सर्वेक्षणात शहर हगणदरीमुक्त असल्याचे दिसून आले. तसा अहवाल समितीच्यावतीने शनिवारी महापालिका आयुक्त अजय लहाने यांना सादर केला.
ह्यस्वच्छ भारतह्ण अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रात ज्या नागरिकांकडे वैयक्तीक शौचालये नाहीत, त्यांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बांधून देण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून मनपा प्रशासनाला निधी प्राप्त झाला. मागील दीड वर्षांपासून प्रशासनाने शहरी भागात पात्र लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना शौचालये बांधून दिली. अभियानच्या दुसऱ्या टप्प्यात शहराला हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार मनपाने अकोलेकरांमध्ये जनजागृती करीत उघड्यावर शौचास बसल्यास रोगराई पसरत असल्याची जाणीव करून दिली. आठ महिन्यांपूर्वी राज्य शासनाच्या चमूने शहराचे सर्वेक्षण केले असता सुधारणेला वाव असल्याचे संकेत दिले होते. त्यादिशेने प्रशासनाने प्रयत्न केल्यानंतर शहर हगणदरीमुक्त झाल्याचा ठराव महापालिकेच्या सभागृहात पारित करण्यात आला.
हा ठराव शासनाकडे सादर केल्यानंतर मनपाच्या दाव्याची पुन्हा पडताळणी करण्यासाठी राज्य शासनाची चमू शहरात दाखल झाली. यामध्ये समितीचे प्रमुख प्रादेशिक उपसंचालक (नगर परिषद शाखा,नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय) सुधीर शंभरकर, चंद्रपूर मनपाचे उपायुक्त विजय देवळीकर, स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनाय विभागाचे सुहास चव्हाण, अस्तित्व महिला बहुउद्देशिय संस्थेच्या (बुलडाणा)पे्रमलता सोनोने यांचा सहभाग होता. समितीने शहराच्या विविध भागात पाहणी करून शहर हगणदरीमुक्त झाल्याचा अहवाल मनपा आयुक्त अजय लहाने यांच्याकडे सादर केला.

गोपनीय पद्धतीने केली तपासणी
शहरातील काही ठराविक भागात नागरिक उघड्यावर शौचास बसतात. याची नोंद मनपा प्रशासनाने घेतल्यानंतर ही माहिती राज्य शासनाकडे सादर करण्यात आली होती. मनपाच्या दाव्यांमध्ये तथ्य आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासाठी शासनाच्या समितीने तीन दिवसांत गोपनीय पद्धतीने तपासणी केल्याची बाब शनिवारी समोर आली.

आयुक्तांकडे सोपवला अहवाल!
शासनाच्या समितीने तयार केलेला अहवाल आयुक्त अजय लहाने यांच्याकडे सादर केला. यावेळी दालनात समितीच्या सदस्यांसह मनपा उपायुक्त समाधान सोळंके, क्षेत्रीय अधिकारी जी.एम.पांडे, अनिल बिडवे, राजेंद्र घनबहाद्दूर, दिलीप जाधव,विभाग प्रमुख शाम गाढे,भरत शर्मा आदी उपस्थित होते.





 

Web Title: In the report of the inspection committee, Akola city is located in Hagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.