विभागातील नऊ बसस्थानकांचा अहवाल केंद्रीय अधिका-यांना सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2016 02:13 AM2016-01-25T02:13:41+5:302016-01-25T02:13:41+5:30

बसस्थानकांना अवैध वाहतुकीचे ग्रहण

Report of nine bus stations in the division presented to the Central Officers | विभागातील नऊ बसस्थानकांचा अहवाल केंद्रीय अधिका-यांना सादर

विभागातील नऊ बसस्थानकांचा अहवाल केंद्रीय अधिका-यांना सादर

Next

राम देशपांडे / अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातील नऊ बसस्थानकांना अवैध वाहतुकीचे ग्रहण लागले असल्याने विभागाच्या उत्पन्नात उत्तरोत्तर घट होत आहे. ४ नोव्हेंबर २0१५ ते १५ जानेवारी २0१६ या कालावधीत यासंदर्भात पुराव्यानिशी गोळा करण्यात आलेली माहिती तथा लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तमालिकचे भाग शुक्रवार ५ जानेवारी रोजी विभागीय अधिकार्‍यांनी मुंबई येथील केंद्रीय अधिकार्‍यांना सादर करण्यात आले असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागात नऊ बसस्थानके आहेत. शहरातील मध्यवर्ती व जुन्या बससस्थानकासह आकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, वाशिम, मंगरूळपीर, रिसोड व कारंजा लाड येथील बसस्थानकांना अवैध प्रवासी वाहतुकीचे ग्रहण लागले आहे. बसस्थानकाच्या २00 मीटर परीघ क्षेत्रात खासगी वाहने उभी करून एसटी महामंडळाचे प्रवासी पळविण्याचा प्रकार सुरू असल्याने, अकोला विभागाला अपेक्षित उत्पन्नात दिवसाकाठी १७ लाखांची तूट सहन करावी लागत आहे. अकोला विभागाला भेडसावणार्‍या या समस्येची माहिती पुरव्यासहित सादर करण्याचे निर्देश एसटी महामंडळाच्या केंद्रीय अधिकार्‍यांनी अकोला विभाग नियत्रकांना दिले होते. त्यानुसार ४ नोव्हेंबर १0१५ ते ५ जानेवारी २0१६ या कालावधीत विभागीय अधिकार्‍यांनी वेळोवेळी या समस्येचा पाठपुरावा करून विभागातील बसस्थानकालगत अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांचे क्रमांक व त्यांची माहिती संकलित केली. तसेच सर्व बसस्थानक प्रमुखांनी वेळोवेळी हद्दीतील पोलीस ठाण्यांना याबाबत तक्रारी सादर केल्या. या मोहिमेत ठिकठिकाणी करण्यात आलेल्या चित्रीकरणाची सीडी तसेच यासंदर्भात लोकमतने प्रकशित केलेल्या वृत्तमालिकेचे भागसुद्धा केंद्रीय अधिकार्‍यांना सादर करण्यात आले असल्याची माहिती अधिकार्‍यांन दिली.

Web Title: Report of nine bus stations in the division presented to the Central Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.