मानवी वस्तीलगत वीटभट्टय़ा नसल्याचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:21 AM2017-10-10T02:21:45+5:302017-10-10T02:21:50+5:30

अकोला: राष्ट्रीय, राज्य महामार्गांलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना बाळापूर शहरासह तालुक्यात एकही पारंपरिक वीटभट्टी नसल्याचा अहवाल तहसीलदारांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे, त्यामुळे कायद्यानुसार वीटभट्टय़ावर कारवाईची जबाबदारी असलेल्या प्रदूषण मंडळाला आता काय करावे,  हा प्रश्न निर्माण झाला आहे. पारंपरिक वीटभट्टय़ांच्या स्थापनेबाबतच्या नियमांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये सुधारणेची अधिसूचना सप्टेंबर २0१६ मध्ये प्रसिद्ध झाली. 

Report of not being a human veteran | मानवी वस्तीलगत वीटभट्टय़ा नसल्याचा अहवाल

मानवी वस्तीलगत वीटभट्टय़ा नसल्याचा अहवाल

googlenewsNext
ठळक मुद्देबाळापूर तहसीलदारांची प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती

सदानंद सिरसाट । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राष्ट्रीय, राज्य महामार्गांलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना बाळापूर शहरासह तालुक्यात एकही पारंपरिक वीटभट्टी नसल्याचा अहवाल तहसीलदारांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे, त्यामुळे कायद्यानुसार वीटभट्टय़ावर कारवाईची जबाबदारी असलेल्या प्रदूषण मंडळाला आता काय करावे,  हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पारंपरिक वीटभट्टय़ांच्या स्थापनेबाबतच्या नियमांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये सुधारणेची अधिसूचना सप्टेंबर २0१६ मध्ये प्रसिद्ध झाली. 
त्याप्रमाणे राष्ट्रीय-राज्य महामार्गापासून दोनशे मीटर अंतरावर वीटभट्टीची जागा निश्‍चित झाली आहे, तर पारंपरिक वीटभट्टय़ा मानवी वस्तीपासून कमीत कमी दोनशे मीटरच्या पुढे असाव्या, असे बंधन आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले; मात्र त्यानंतरही हवेची गुणवत्ता बिघडविणार्‍या वीटभट्टय़ांसंदर्भात कोणतीही कारवाई अद्याप प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केली नाही. त्यासाठी महसूल विभागाकडून सातत्याने केवळ माहिती मागविण्यात आली. 
ती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर फेब्रुवारी २0१७ मध्ये जिल्हय़ात कागदोपत्री केवळ ४६ वीटभट्टय़ा असल्याचे दर्शवण्यात आले. त्यापैकी सहा ठिकाणी वीज केंद्रातील राखेपासून विटांची निर्मिती केली जाते. 

वीटभट्टय़ांसाठी बंधनकारक नियम
मानवी वसाहतीलगतच्या पर्यावरणातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी विटांचा आकार व एकावेळी निर्मितीच्या संख्येनुसार वीटभट्टीधारकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती असल्याशिवाय वीटभट्टी सुरू करता येत नाही, असा नियम आहे. त्यामध्ये ९ : ४ : ६ इंच आकाराच्या २५ हजार आणि  ९ : ४ : ३ इंच आकाराच्या ५0 हजारांपेक्षा जास्त नगांची निर्मिती करणार्‍यांना राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानके आणि कायद्यातील अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येने विटांची निर्मिती करणार्‍यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीची गरज नसली, तरी कायद्यातील अटी व शर्ती पाळणे बंधनकारक आहेत.

महामार्गालगत वीटभट्टय़ांची गर्दी 
कायद्यानुसार वीटभट्टय़ांना आता प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घ्यावी लागणार आहे; मात्र सद्यस्थितीत अकोला जिल्हय़ातील अनेक गावे, महामार्गालगतच वीटभट्टय़ांची प्रचंड गर्दी आहे. त्यामध्ये बाळापूर, चोहोट्टा, हाता, अंदुरा, भौरद, मनात्री या ठिकाणी महामार्गालगतच वीटभट्टय़ा आहेत. त्यापैकी काहीच भट्टय़ांची माहिती महसूल विभागाकडे आहे. उर्वरित भट्टय़ा अनधिकृत असल्याचेच चित्र आहे. आता तर बाळापूर तहसीलदारांनी वीटभट्टय़ांची माहितीच निरंक दिली. त्यानुसार कारवाई कुणावर करावी, हा प्रश्न प्रदूषण नियंत्रण मंडळाला पडला आहे. 

आधीच्या माहितीत तफावत 
सुरुवातीला बाळापूर तहसीलदारांनी तालुक्यात १0 वीटभट्टय़ा असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली होती. आता निरंक देण्यात आली. त्याचवेळी मूर्तिजापूर-२३, अकोट-९, अकोला-२, बाश्रीटाकळी-१ अशीही माहिती देण्यात आली होती. 

Web Title: Report of not being a human veteran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.