सहकारी संस्थांबाबतचे आक्षेप अवसायकाकडे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:32 AM2021-02-18T04:32:11+5:302021-02-18T04:32:11+5:30

कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्या अकोला : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजना बेरोजगार उमेदवारांसाठी ...

Report objections to co-operatives to professionals | सहकारी संस्थांबाबतचे आक्षेप अवसायकाकडे नोंदवा

सहकारी संस्थांबाबतचे आक्षेप अवसायकाकडे नोंदवा

Next

कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्या

अकोला : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजना बेरोजगार उमेदवारांसाठी उपलब्ध असून, गरजू उमेदवारांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी महामंडळाकडून व्याजाचा परतावा या योजनेंतर्गत अर्थसाहाय्य दिले जाते. या याेजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्रांजली यो. बारस्कर व कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुधाकर झळके यांनी केले आहे.

काेविड याेद्ध्यांचा सन्मान

अकाेला अमन साेसायटीच्या वतीने काेविड याेद्ध्यांचा सत्कार करण्यात आला इद जलसा कमिटीचे अध्यक्ष हाजी मुदाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शब्बीर अहमद विद्राेही जावेद हबी डाॅनाैशाद सिद्दीकी रिजवान अंसारी सै युसुफ अली राजकुमार मुलचंदानी सरफराज खान जावेद जकारिया आदी उपस्थित हाेते यावेळी इमरान खान माे साकिब अंजुमन ऐ बैद इरशाद भाई सईद भाई यांचा सत्कार करण्यात आला

रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती

अकाेला सीताबाई महाविद्यालयाच्या रासेया पथकाने रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती माेहीम राबविली यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. अमाेल गावंडे सुनीता बन्ने डाॅ. प्रसेनजित गवई, वाहतूक नियंत्रक तुषार केणे, आशिष गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले.

आरडीजीमध्ये सेवालाल महाजरा जयंती

अकाेला श्रीमती राधादेवी गाेयनका महिला महाविद्यालयामध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी डाॅ अंबादास पांडे हे हाेते. यावेळी डाॅ. धनश्री पांडे, जयश्री बंड, डाॅ. विनाेद खैरे, प्रा अनुप शर्मा, प्रा संजय विटे आदी उपस्थिती हाेते.

Web Title: Report objections to co-operatives to professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.