दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचाअहवाल पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 06:39 PM2021-12-20T18:39:10+5:302021-12-20T18:42:09+5:30

CoronaVirus in Akola : दुबईतून आलेल्या एका रुग्णाचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

Report of a young woman who came to Akola from Dubai is corona positive! | दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचाअहवाल पॉझिटिव्ह!

दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचाअहवाल पॉझिटिव्ह!

Next
ठळक मुद्दे‘ओमायक्रॉन’च्या तपासणीसाठी नमुने पुण्याला रवाना गृहविलगीकरणात असून कोरोनाचे कुठलेही लक्षणे नाहीत

अकोला: दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. ‘ओमायक्रॉन’च्या निदानासाठी रुग्णाचे ‘आरएनए’ सॅम्पल पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. रुग्ण गृहविलगीकरणात असून कोरोनाचे कुठलेही लक्षणे नसल्याची माहिती आहे. राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या धडकी भरवणारी आहे. अशातच गत आठवड्यात शेजारील बुलडाणा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. या घटनेला आठवडा होत नाही, तोच अकोल्यात दुबईतून आलेल्या एका रुग्णाचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. रुग्ण एक युवती असून ती महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहे. शनिवारी रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. रविवारी रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कुठल्याही प्रकारचे लक्षणं नसल्याने रुग्णाला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले. रुग्णाचे ‘आरएनए’ सॅम्पल तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Report of a young woman who came to Akola from Dubai is corona positive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.