कुरुम ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:12 AM2021-02-05T06:12:50+5:302021-02-05T06:12:50+5:30

यावेळी ध्वजारोहण तंटामुक्ती अध्यक्ष श्रावणजी दावेदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत सादर करून ग्रा.वि.अ. दीपक मुनेश्वर यांनी भारतीय ...

Republic Day at Kurum Gram Panchayat | कुरुम ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन

कुरुम ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन

googlenewsNext

यावेळी ध्वजारोहण तंटामुक्ती अध्यक्ष श्रावणजी दावेदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत सादर करून ग्रा.वि.अ. दीपक मुनेश्वर यांनी भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून सर्वांना शपथ दिली. कार्यक्रमाला जि.प.सदस्या योगिता रोकडे, महसूल मंडळ अधिकारी सदानंद देशपांडे, माजी पं.स.सदस्य मोहन रोकडे, तंटामुक्ती अध्यक्ष श्रावण दावेदार,भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख आदींची उपस्थिती होती.

यावेळी नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्याच्या हस्ते भारत माता व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमाला माजी सरपंच सविता दहीकर, माजी ग्रा.पं.सदस्य, पो.पा.वसंत विरुळकर,नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्य इम्रान खान, सुनील पवार, अंकिता गुल्हाने, शिल्पा भावेकर, शैलेंद्र जावरकर, भाग्यश्री मानकर, जीवन इंगोले, अतुल वाठ, गोपाल मालवे, दीपाली गवई, विलास कांडलकर, नाहीदनाज इम्रान खान, शिल्पा खडसे, अय्युब शहा, चंद्रकांत देशमुख, माजी सरपंच संतोष माहुरे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चंद्रकांत देशमुख यांनी केले.

Web Title: Republic Day at Kurum Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.