२५ फूट खोल विहिरीत उतरून हरणाला जीवदान
By रवी दामोदर | Updated: June 25, 2024 18:48 IST2024-06-25T18:47:44+5:302024-06-25T18:48:21+5:30
हरणाची चपळता बघून प्रथम त्याला जाळी टाकून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचाऱ्यांना यश आले नाही...

२५ फूट खोल विहिरीत उतरून हरणाला जीवदान
अकोला : शहरालगत असलेल्या डाबकी परिसरातील २५ फूट कोरड्या विहिरीत पडलेल्या हरणाला बाहेर काढून जीवदान दिल्याची घटना दि.२५ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली.
डाबकी परिसरात एका कोरड्या विहिरीत हरीण पडले होते. यासंदर्भात ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच आरएफओ विश्वास थोरात, वनपाल गजानन इंगळे यांनी रेस्कु टीमचे मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे वनरक्षक शेखर गाडबैल, अक्षय खंडारे, चालक आलासिंह राठोड यांच्यासह घटनास्थळ गाठले.
हरणाची चपळता बघून प्रथम त्याला जाळी टाकून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचाऱ्यांना यश आले नाही. त्यानंतर मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे विहिरीत उतरले. त्यांच्या मदतीस सर्पमित्र दीपक पाटिलही विहिरीत उतरले. हरणाला शिंगे असल्याने अलगद त्याला जाळीत टाकले. त्यानंतर हरणाला विहिरीबाहेर काढून जीवनदान देत जंगलात सोडून दिले. यावेळी रमन दामोदर, अक्षय चौधरी, गौतम बोदडे यांनी मदत केली.
-----------
वन्यजीव अशा कोरड्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडतात अथवा जख्मी होतात. त्यामुळे कोरड्या विहिरींवर आवरन टाकण्यात यावे. तसेच नागरिकांना माहिती मिळताच वन विभागाला सांगावे.
- बाळ काळणे, मानद वन्यजीव रक्षक, अकोला.