हवामानाला अनुकूल कापसावर संशोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 01:52 PM2020-01-06T13:52:00+5:302020-01-06T13:52:05+5:30

प्रतिहेक्टरी ८ ते १० क्विंटल कापसाचे उत्पादन देणारे हे वाण आखूड धाग्याचे असल्याने या कापसाचा वापर वैद्यकीय (सर्जिकल कॉटन) उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात होतो.

Research on climate-friendly cotton! | हवामानाला अनुकूल कापसावर संशोधन!

हवामानाला अनुकूल कापसावर संशोधन!

Next

- राजरत्न सिरसाट
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हवामानाला अनुकूल कमी कालावधीत येणारे नवीन कापूस बियाणे संशोधन हाती घेतले असून, यंत्राने कापूस वेचणी करता यावा, यासाठीचे प्रयत्नही सुरू आहेत. नवे बियाणे येत्या एक-दोन वर्षांत शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत कापसाचे १५ च्यावर देशी व अमेरिकन वाण विकसित केले असून,यावर्षी शुभ्रा हे कापूस बियाणे विकसीत करू न शेतकऱ्यांनासाठी आणले आहे. याच कृषी विद्यापीठाच्या ४६८ या वाणाने कापूस उत्पादनात देशात क्रांती केली आहे. रस शोषण किडीला प्रतिबंधक एकेएच-९९१६ हे नवे (अमेरिकन) सरळ वाण विकसित केले आहे. खास दक्षिण भारतासाठी एकेएच २००५-०३ हे देशी कापसाचे वाण विकसित केले असून, कोरडवाहू क्षेत्रात प्रतिहेक्टरी ८ ते १० क्विंटल कापसाचे उत्पादन देणारे हे वाण आखूड धाग्याचे असल्याने या कापसाचा वापर वैद्यकीय (सर्जिकल कॉटन) उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात होतो. विशेष म्हणजे, पाण्याचा ताण सहन करणारे हे वाण आहे. १९७८ मध्ये डीएचवाय २८६ हे कापसाचे वाण विकसित करण्यात आले होते. ८४०१ त्यांचे हे वाणदेखील शेतकºयांच्या पसंतीस उतरले होते. एकेएच-५ आणि रंगीत कापसाचे वाण विकसित केले. तसेच पीकेव्ही-५ सह २०१४ मध्ये कापूस संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. बी. आर. पाटील व डॉ. टी. एच. राठोड यांच्या कार्यकाळात एकेएच-२०५-३ हे देशी वाण बाजारात आणले. सुवर्णा हायब्रीड, पीकेव्ही-जेकेसीएच-१६ व पीकेव्ही हायब्रीड ईजी-२ हे दोन वाण डॉ. राठोड यांच्या कार्यकाळात विकसित झाले.
सर्व वाण उत्तम उत्पादन देणारी आहेत. तथापि, हवामान वातावरणाला अनुकूल असे नवे संशोधन कृषी विद्यापीठाने हाती घेतले आहे. सध्या मजुरांची प्रचंड वानवा असल्याने कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने कृषी विद्यापीठाने कापूस वेचणीसाठी यंत्र विकसित करण्यावर भर दिला आहे. २०११-१२ मध्ये कृषी विद्यापीठात यंत्राणे कापूस वेचणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले होते. आता नव्याने यावर भर देण्यात आला आहे.


 आतापर्यंत वेगवेगळ््या वातावरणात भरघोस उत्पादन देणारे कापसाचे वाण विकसीत केले आहे. आता हवामानाला अनुकूल कमी कालावधीत येणाºया कपाशीवर संशोधन करण्यात येत आहे.तसेच यंत्राने कापूस वेचणीवरही भर देण्यात येत आहे.
- डॉ.विलास भाले,
कुलगुरू,
डॉ.पंदेकृवि,अकोला.

 

Web Title: Research on climate-friendly cotton!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.