अकोला जिल्ह्यातील २२५ सरपंचपदांचे आरक्षण ८ डिसेंबरला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 10:51 AM2020-11-28T10:51:58+5:302020-11-28T10:52:09+5:30
तहसील कार्यालयांमध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
अकोला: जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण ८ डिसेंबर रोजी निश्चित होणार आहे. त्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग इत्यादी प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये सरपंचपदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने कोणत्या ग्रामपंचायतींचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
महिला सरपंचपदांचे आरक्षण ११ डिसेंबरला!
जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग इत्यादी प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित झाल्यानंतर महिला सरपंचपदांचे आरक्षण ११ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महिला सरपंच पदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीसाठी ग्रामपंचायतींची अशी आहे संख्या!
अकोला ३६
अकोट ३८
बाळापूर ३८
बार्शीटाकळी २७
पातूर २३
तेल्हारा ३४
मूर्तिजापूर २९