जिल्ह्यातील २७१ महिला सरपंचपदांचे आज आरक्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:45 AM2020-12-11T04:45:33+5:302020-12-11T04:45:33+5:30
अकोला : जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांपैकी २७१ ग्रामपंचायतींच्या महिला सरपंचपदांचे आरक्षण शुक्रवार, ११ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यासाठी ...
अकोला : जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांपैकी २७१ ग्रामपंचायतींच्या महिला सरपंचपदांचे आरक्षण शुक्रवार, ११ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महिला सरपंचपदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या आनुषंगाने जिल्ह्यातील कोणकोणत्या ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित होते, यासंदर्भात आता ग्रामस्थांसह इच्छुकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील एकूण ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी २०२० ते २०२५ या कालावधीकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत दि. ८ डिसेंबर जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयात काढण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील ५३२ सरपंचपदांपैकी २७१ महिला सरपंचपदांची आरक्षण सोडत ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या महिला सरंपचपदांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण इत्यादी प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्या आनुषंगाने जिल्ह्यातील कोणकोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिला प्रवर्गासाठी राखीव होते, याबाबत आता ग्रामस्थांसह इच्छुकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांपैकी २७१ महिला सरपंचपदांसाठी आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी