मूर्तिजापूर तालुक्यातील ८६ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:44+5:302020-12-09T04:14:44+5:30
तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींपैकी २६ ग्रामपंचायतची मुदत ऑगस्ट रोजी संपल्याने यातील २६ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. तीन ग्रामपंचायत ...
तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींपैकी २६ ग्रामपंचायतची मुदत ऑगस्ट रोजी संपल्याने यातील २६ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. तीन ग्रामपंचायत सरपंचपदाची मुदत नोव्हेंबरमध्ये संपुष्टात आली असल्याने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रभारी उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या निरीक्षणात येथील शासकीय गोदामात घेण्यात आलेल्या सभेत जाहीर करण्यात आले.
या सोडतीनुसार २२ गावांची सरपंचपदे अनुसूचित जातीसाठी, ३ गावांची सरपंचपदे अनुसूचित जमातीसाठी, तर २३ ग्रामपंचायतीची सरपंचपदे आळीपाळीने व ईश्वरचिठ्ठीने नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी आरक्षित झाली. उर्वरित ३८ ग्रामपंचायतींची सरपंचपदे सर्वसाधारण उमेदवारांसाठी सुटली आहेत. महिलांचे विविध प्रवर्गातील आरक्षण शुक्रवारी अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेत निश्चित होईल. अनुसूचित जातीसाठी राखीव सरपंचपदे : खांदला, मंदुरा, अकोली ज., अनभोरा, मंगरूळ कांबे, गोरेगाव, भगोरा, जितापूर खेडकर, रेपाळखेड, मुंगशी, बोर्टा, ब्रम्ही खुर्द, टिपटाळा, दताळा, पोही, दातवी, सालतवाडा, लाखपुरी, विराहित, चिखली, खोडद व बिडगाव, अनुसूचित जमातीसाठी : कव्हळा, नागोली, सिरसो, नामाप्रसाठी : कार्ली, धामोरी बु., धोत्रा शिंदे, बोरगांव निंघोट, सोनोरी (बपोरी), आरखेड, कोळसरा, जांभा बु., दहातोंडा, माना, मोझर, एंडली, लंघापूर, वडगाव, राजनापूर खि., शेलू बाजार, रामटेक, कानडी, नवसाळ, विरवाडा, निंभा, सांजापूर, किनखेड, सर्वसाधारण : कंझरा, कवठा (खोलापूर), कवठा सोपीनाथ, कुरूम, खरब नवले, खापरवाडा, गाझीपूर, घुंगशी, जांभा खु., जामठी बु, दापुरा, दुर्गावाडा, धानोरा (पाटेकर), धानोरा वैद्य, पारद, बपोरी, भाटोरी, मधापुरी, माटोडा, मुरंबा, मोहखेड, रंभापूर, राजुरा (घाटे), लोणसणा, वाई (माना), शिवण खु., शेरवाडी, शेलूनजीक, समशेरपूर, सांगवी, सोनाळा, हातगाव, हिरपूर, हिवरा कोरडे, सोनोरी (मु), सांगवान मेळ, उमरी व राजुरा (सरोदे) या ८६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
२९ ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका
पारद, भटोरी, मंगरुळ कांबे, गोरेगाव, लाखपुरी, सिरसो, दुर्गवाडा, सांगवी, टिपटाळा, हिरपुर, कवठा (खोलापूर), सोनोरी (बपोरी), बपोरी, कुरूम, माटोडा, कवठा (सोपीनाथ), धामोरी बु, काली, राजुरा घाटे, खांदला, धानोरा (पाटेकर), निभा, विरहित, मोहखेड, कंझरा, अनभोरा, जामठी बु., हातगाव, चिखली.