अकोला शहरासह जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ठरले आरक्षण!

By संतोष येलकर | Published: October 21, 2023 07:16 PM2023-10-21T19:16:43+5:302023-10-21T19:17:11+5:30

चालू वर्षभराच्या कालावधीसाठी अकोला शहरासह जिल्ह्यातील १३ पाणीपुरवठा योजनांकरिता पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठरविण्यात आले आहे.

Reservation of drinking water in the district with the city of Akola | अकोला शहरासह जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ठरले आरक्षण!

अकोला शहरासह जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ठरले आरक्षण!

अकोला: चालू वर्षभराच्या कालावधीसाठी अकोला शहरासह जिल्ह्यातील १३ पाणीपुरवठा योजनांकरिता पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठरविण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजनांसह अन्य योजनांसाठी जिल्ह्यातील सात प्रकल्पांतून ९२.६७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्यास जिल्हा पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत १६ ऑक्टोबर रोजी मंजुरी देण्यात आली.

महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी आरक्षण समितीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये १ नोव्हेंबर २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या वर्षभराच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील सात प्रकल्पांतील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानुसार अकोला शहर पाणीपुरवठा योजनांसह जिल्ह्यातील १३ पाणीपुरवठा आणि अन्य तीन योजनांसाठी ९२.६७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्यात आला.
 
काटेपूर्णा धरणातून अकोला शहराला मिळणार २४ दशलक्ष घनमीटर पाणी 
निश्चित करण्यात आलेल्या पाणी आरक्षणानुसार येत्या वर्षभराच्या कालावधीत महान येथील काटेपूर्णा धरणातून येत्या वर्षभराच्या कालावधीत अकोला शहर पाणीपुरवठा योजनेला २४ दशलक्ष घनमीटर पाणी मिळणार आहे. या पाणीसाठ्यावर अकोला शहरवासीयांची तहान भागविण्यात येणार आहे.
 
प्रकल्पनिहाय असे आहे पिण्याच्या पाण्याचे आरक्षण
काटेपूर्णा प्रकल्प : या प्रकल्पातून अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी २४ दलघमी, महान मत्स्यबीज केंद्र पाणीपुरवठा योजनेसाठी ०.८५ दलघमी, ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ६.९९ दलघमी, मूर्तिजापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ३.५३ दलघमी, अकोल्यातील ‘एमआयडीसी’साठी ०.७४ दलघमी.

वान प्रकल्प : या प्रकल्पातून अकोट शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ८.६६ दलघमी, तेल्हारा शहर पाणीपुरवठा योजनेसाठी २ दलघमी, ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी १०.७५ दलघमी.
मोर्णा प्रकल्प : या प्रकल्पातून पातूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १.२४२ दलघमी, देऊळगाव पास्टुल १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी १.९१ दलघमी.

निर्गुणा प्रकल्प : या प्रकल्पातून आलेगाव-नवेगाव १४ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी १.७९ दलघमी. 

उमा प्रकल्प : या प्रकल्पातून लंघापूर ५९ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी १.३० दलघमी.
मन नदी : या प्रकल्पातून पारस औष्णिक केंद्रासाठी १४.५० दलघमी.
 
शेगावसाठी मन नदी, कसुरा बंधाऱ्यातून पाणी 
शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानसाठी अकोला जिल्ह्यातील मन नदी प्रकल्पातून १.०४ दलघमी आणि कसुरा बंधारा प्रकल्पातून ०.७५ दलघमी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे.
 

Web Title: Reservation of drinking water in the district with the city of Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.