जिल्ह्यातील सरपंचपदांचे आरक्षण जाहीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:15 AM2020-12-09T04:15:06+5:302020-12-09T04:15:06+5:30
अकोला: जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत मंगळवार, ८ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये काढण्यात आली. त्यामध्ये ...
अकोला: जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत मंगळवार, ८ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये काढण्यात आली. त्यामध्ये प्रवर्गनिहाय सरपंचपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील महिला सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत ११ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे. त्यानुषंगाने महिला सरपंचपदांच्या आरक्षणाकडे आता लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरपर्यंत संपली असून, या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसह एकूण ५३२ ग्रामपंचायतींच्या २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंचपदांची आरक्षण सोडत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये काढण्यात आली. त्यामध्ये ग्रामपंचायतनिहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्ग इत्यादी प्रवर्गनिहाय सरपंचपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील महिला सरपंचपदांची आरक्षण सोडत ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे. त्यानुषंगाने महिला सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीमध्ये जिल्ह्यातील कोणकोणत्या ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिला प्रवर्गासाठी आरक्षीत होते, याकडे आता लक्ष लागले आहे.
सरपंचपदांचे आरक्षण जाहीर
झालेल्या अशा आहेत ग्रामपंचायती!
तालुका ग्रा.पं.
अकोला ९७
अकोट ८४
बाळापूर ६६
बार्शीटाकळी ८०
मूर्तिजापूर ८६
पातूर ५७
तेल्हारा ६२
..........................................
एकूण ५३२
अकोला तालुक्यातील सरपंचपदांचे
प्रवर्गनिहाय असे आहे आरक्षण!
अकोला तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत मंगळवारी तहसील कार्यालयात काढण्यात आली. त्यामध्ये २८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जाती, ८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमाती, २६ ग्रामपंचायतींचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) आणि ३५ ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित जाहीर करण्यात आले.