पंचायत समिती सभापतींची आज आरक्षण सोडत

By admin | Published: June 23, 2016 12:53 AM2016-06-23T00:53:45+5:302016-06-23T00:53:45+5:30

अकोला जिल्ह्यातील सदस्यांची उत्कंठा शिगेला!

Resignation of Chairman of Panchayat Samiti today | पंचायत समिती सभापतींची आज आरक्षण सोडत

पंचायत समिती सभापतींची आज आरक्षण सोडत

Next

अकोला: जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापतिपदांची आरक्षण सोडत गुरुवार, २३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे काढण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर कोणत्या पंचायत समितीचे सभापतिपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, याबाबत जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांच्या विद्ममान सभापतींचा अडीच वर्षांचा कालावधी संपत आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी पंचायत समितींच्या नवीन सभापती व उपसभापतींची निवड जुलैमध्ये करण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत गत आठवड्यात पंचायत समिती सभापतींचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील दोन पंचायत समिती अनुसूचित जाती, एक पंचायत समिती अनुसूचित जमाती, दोन पंचायत समिती नागरिकांचा मागास प्रवर्ग व दोन पंचायत समित्यांचे सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्‍चित करण्यात आले आहे. प्रवर्गनिहाय सभापतिपदांचे आरक्षण निश्‍चित करण्यात आले असले तरी पंचायत समितीनिहाय सभापतिपदांच्या आरक्षणाची सोडत गुरुवार, २३ जून रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीमध्येजिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापतिपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने आरक्षण सोडतीमध्ये जिल्ह्यातील कोणकोणत्या पंचायत समितीचे सभापतिपद कोणकोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, याबाबत सातही पंचायत समितींच्या सदस्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Web Title: Resignation of Chairman of Panchayat Samiti today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.