पैसेवारी कमी करण्याचा घेणार ठराव!

By admin | Published: October 12, 2015 01:57 AM2015-10-12T01:57:50+5:302015-10-12T01:57:50+5:30

शेतक-यांसाठी ग्रामपंचायती सरसावल्या; शासनाकडे करणार पाठपुरावा.

Resolution to reduce money! | पैसेवारी कमी करण्याचा घेणार ठराव!

पैसेवारी कमी करण्याचा घेणार ठराव!

Next

सायखेड (जि. अकोला ): निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत तीन वषार्ंपासून दुष्काळाचा सामना करणार्‍या बाश्रीटाकळी तालुक्यातील शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी आता तालुक्यातील ११ पेक्षा जास्त ग्रामपंचायत सरसावल्या आहेत. शासनाने पैसेवारीचे निकष बदलून ५0 पैशाचे आत पैसेवारी जाहीर करावी आणि दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना न्याय द्यावा, असा ठराव मासिक सभेत घेण्यात येणार आहे. हा ठराव महसूल विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांनी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या सोयाबीनखक पीक फुलोरा अवस्थेत असून, पावसाने दडी मारल्यामुळे उत्पादन कमालीचे घटले आहे. तालुक्यातील बहुतांश भागातील पीक परिस्थिती अत्यंत बिकट असून, मशागत, पेरणी, निंदण, बियाणे, खते, डवरणी, फवारणी आदींवर झालेला खर्चही भरून निघणार नसल्याने शेतकरी पुरता खचला आहे. बाश्रीटाकळी तालुक्यात धाबा, राजंदा, पिंजर, महान, बाश्रीटाकळी, खेर्डा या सहा महसूल मंडळामध्ये १५९ गावांचा समावेश आहे. धाबा मंडळातील सर्वाधिक गावांना पीक उत्पादनात फटका बसला असून, तालुक्या तील काही भाग वगळता पिकांची स्थिती बिकट आहे. अपुर्‍या पावसामुळे चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शेतकर्‍यांना शासनाकडून भरीव मदत मिळण्यासाठी ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. तालुक्यातील गावांमधील पैसेवारी ५0 पैशाच्या आत जाहीर करून जाहीर करून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशा असा ठराव मासिक सभेत घेण्यात येणार आहे.

Web Title: Resolution to reduce money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.