शहरातील काँग्रेसला बळकट करण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2016 02:21 AM2016-07-07T02:21:17+5:302016-07-07T02:21:17+5:30
अकोला महानगर काँग्रेस अध्यक्ष बबनराव चौधरी यांनी घेतला पदभार.
अकोला: सर्व कार्यकर्त्यांंना सोबत घेऊन पक्ष संघटनसाठी बाजी लावणार, तसेच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व नेत्यांच्या मदतीने मनपाची सत्ता काबीज करणार असल्याची ग्वाही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दिली.
स्वराज भवन येथे बबनराव चौधरी यांचा पदग्रहण सोहळ्य़ाचे बुधवारी आयोजन केले होते. यावेळी मावळते अध्यक्ष माजी महापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मदन भरगड यांचादेखील सुमारे पंधरा वर्षे शहर अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नतिकोद्दीन खतीब, महासचिव मदन भरगड, सचिव डॉ. सुधीर ढोणे, माजी जि.प. अध्यक्ष श्रावण इंगळे, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाबाराव विखे पाटील, ज्ञानदेवराव ठाकरे, अजिज अहमद, निखिलेश दिवेकर, मेहबुब खान, अब्दुल जब्बार, अलीयार खान, इंटकचे अध्यक्ष प्रदीप वखारिया, प्रा. राजाभाऊ देशमुख, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुषमा निचळ, प्रदेश सचिव स्वाती देशमुख, विभा राऊत, तश्वर पटेल, दिलीप खत्री, सुरेश ढाकुलकर, रवि शिंदे, मनीष हिवराळे, विजय शर्मा, राजेंद्र चितलांगे, उमाकांत कवडे, राजु बगथेरिया, अजहर इकबाल, डॉ.मोहन खरे, युसुफ पठाण, सिचन गिरी, अफरोज लोधी, डॉ.मिलींद पवार, गणेश कटारे विलास नावकार, राजकुमार परदेशी, शहजाद खान, निलेश पवार, शिवम तांबोली, बी.जी.डोंगरे, अविनाश अवसरे, मन्नान सिद्दीकी, संजय लोखंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन काँग्रेस कमिटीचे महासचिव कपिल रावदेव यांनी केले. आभार काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष तश्वर पटेल यांनी केले.