आगामी निवडणुकीसाठी ठराव : सेनेची पुन्हा स्वबळाची परीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:25 AM2018-01-24T02:25:06+5:302018-01-24T02:25:20+5:30
अकोला : आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या ठरावाला शिवसेनेच्या पक्ष कार्यकारिणीत एकमताने मंजुरी मिळाली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेने हा स्वाभिमानी एल्गार पुकारला असल्याने राजकीय वर्तृळात ही घोषणा गांभीर्याने घेतली जाईल.
राजेश शेगोकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या ठरावाला शिवसेनेच्या पक्ष कार्यकारिणीत एकमताने मंजुरी मिळाली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेने हा स्वाभिमानी एल्गार पुकारला असल्याने राजकीय वर्तृळात ही घोषणा गांभीर्याने घेतली जाईल. या पृष्ठभूमीवर अकोल्यातील शिवसेनेची दशा अन् दिशा याचा मागोवा घेतला असता सेनेला स्वबळावर शिवधनुष्य पेलण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार असल्याचे स्पष्ट चित्र दृष्टिक्षेपात येते. निवडणुकीला किमान सहा-आठ महिन्यांचा कालावधी असल्याने स्वबळावरचे शिवधनुष्य पेलणारे ‘पहिलवान’ तयार करण्यासाठी सर्वाधिक कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे.
ल्ल पाच विधानसभा मतदारसंघ असलेल्या अकोल्यातून विधानसभेत सध्या शिवसेनेचा एकही आमदार नाही. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला वेळेवर स्वबळाची तयारी करावी लागली होती. त्याचा फटका मोठय़ा प्रमाणात बसला. निवडणुकीनंतर पुन्हा सेना व भाजपाची युती होऊन सेना सत्तेत सहभागी झाली असली तरी सेना सत्तेत असल्याचे कुठेही जाणवले नाही. सरकारच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेणारी सेना गेल्या वर्षात कर्जमाफीसह अनेक मुद्यांवर थेट रस्त्यावर येऊन सरकारलाच आव्हान देताना दिसली. अकोल्यातही हेच चित्र होते. त्यामुळे महापालिका असो की नगरपालिका, भाजपाने सेनेला युतीबाबत साधी विचारणाही न करता निवडणुकांची तयारी केली व निवडणुका जिंकून आता आम्हीच ‘मोठे भाऊ’ हे अधोरेखित केले.
खा. संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजपाने केलेली तयारी ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरतीच र्मयादित ठेवलेली नाही. संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक बुथनिहाय नियोजन करून स्वबळाची पेरणी आधीच केली आहे. अशा स्थितीत सेनेपुढे आधी भाजपाचेच आव्हान आहे. अकोला पूर्व व पश्चिम हे विधानसभेचे मतदारसंघ शहरबहुल आहेत. शहराच्या हद्दवाढीमध्ये पूर्व भागात समाविष्ट झालेल्या ग्रामीण क्षेत्राने महापालिका निवडणुकीत भाजपालाच कौल दिला. या मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी मतदारसंघाची भक्कम बांधणी केली, तर पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांचा ‘थेट संपर्क’ ही सर्वाधिक जमेची बाजू असल्याने सतत पाचव्यांदा ते विजयी झाले आहेत. या दोन्ही मतदारसंघात सेनेने अतुल पवनीकर व राजेश मिo्रा यांच्या रूपाने नव्या दमाचे शहरप्रमुख नेमले आहेत. त्यांनी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात आंदोलने व कार्यक्रम वाढविले असले तरी आमदार गोपीकिशन बाजोरिया, o्रीरंगदादा पिंजरकर, दोन्ही शहरप्रमुख, संतोष अनासने, मंजूषा शेळके अशी उमेदवारांची दावेदारी वाढतीच आहे.
अकोट हा मतदारसंघ सेनेने गेल्या निवडणुकीत गमावला. या मतदारसंघाची जबाबदारी आता आ. बाजोरिया यांच्याकडे सोपविली आहे. आ. बाजोरिया यांनी अकोटमधील दौरे वाढविले असल्याने ते अकोटात लढू शकतात, अशी चर्चा आहे तर दुसरीकडे माजी आमदार संजय गावंडे हे पुन्हा एकदा नव्या दमाने रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात भाजपाने मारलेली मुसंडी व प्रहारची भर सेनेसाठी त्रासदायक आहे. बाळापूर मतदारसंघात स्वत: जिल्हाप्रमुख नितीन देशमुख हेच इच्छुक आहेत. त्यामुळे रुमणे मोर्चाची सुरुवात बाळापुरातून करून त्यांनी निवडणुकीचीच पेरणी केली होती. २00९ च्या निवडणुकीत त्यांच्या मदतीला धावलेले अदृश्य हात यावेळी पुन्हा येतील अन् गणिते बदलवतील, असा त्यांच्या चाहत्यांचा होरा आहे. प्रत्यक्षात मात्र आता पुलाखालून खूप पाणी निघून गेले असून, सारी गणितेच बदलली असल्याने बाळापूर सेनेसाठी सध्या तरी अवघड असा किल्ला आहे.
मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपाने आपली पाळेमुळे भक्कम केली आहेत. लागोपाठ दोन वेळा हा मतदारसंघ जिंकून आमदार हरीश पिंपळे यांनी भाजप नेतृत्वाचे लक्ष वेधले असले तरी दुसरीकडे पिंपळे यांना पर्याय तयार ठेवण्याचे काम भाजपाने केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात सेनेला आपली ताकद वाढविण्याची संधी असली तरी ‘चेहरा’ मिळत नसल्याने सारी पंचाईत आहे.
या सर्व पृष्ठभूमीवर संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांच्यातील हेडमास्टर शिवसैनिकांकडून परीक्षेची तयारी कशी करून घेतो, यावरही स्वबळाच्या परीक्षेचा निकाल ठरणार आहे. सध्या सपशेल नापास असलेली सेना २0१९ च्या परीक्षेत भोपळा फोडण्यासाठी स्वबळाचे ‘शिवधनुष्य’ कसे उचलते, यावरच सारे अवलंबून आहे.
आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याचा एल्गार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेने स्वबळावर निवडणुकीचा एल्गार पुकारला आहे. गेल्या निवडणुकीत सेनेला मिळालेल्या मतदानाचे आकडे तसेच त्यानंतर पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील गुण सेनेचे प्रगतिपुस्तक दर्शवितात. त्यामुळे संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांच्यातील हेडमास्टर शिवसैनिकांकडून २0१९ च्या परीक्षेची तयारी कशी करून घेतात. यावरही स्वबळाच्या परीक्षेचा निकाल ठरणार आहे.