गरबा दांडिया प्रशिक्षण शिबिराला प्रतिसाद
By admin | Published: September 22, 2014 11:56 PM2014-09-22T23:56:06+5:302014-09-23T00:10:33+5:30
लोकमत सखी मंचचे आयोजन : विविध सामाजिक संघटनांचा सहभाग
खामगाव : आदिशक्ती आई अंबाबाईच्या नवरात्रोत्सवात खास आकर्षण असलेल्या गरबा -दांडियाचे प्रशिक्षण शिबिर लोकमत सखी मंचच्यावतीने आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर आणि जळगाव जामोद येथे आयोजित या शिबिराला युवती तसेच महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नवरात्रात गरब्याच्या तालावर नाचताना अनेकांच्या नृत्याची लय चुकते. तर काहींना अजिबात गरबा दांडिया खेळता येत नाही. ही बाब हेरून लोकमत सखी मंचने काही सामाजिक संघटना तसेच गरबा दांडिया कलावंतांच्या मदतीने गरबा दांडिया प्रशिक्षण शिबिर आयोजित केले. १५ ते २४ सप्टेंबरपर्यंत या शिबिरात विविध शहरातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खामगाव येथे पूजा वाघमारे आणि मीनू मोहता यांनी तीन बॅचेसमध्ये सुमारे दीडशेच्यावर महिलांना प्रशिक्षण दिले. शिबिर यशस्वी करण्यासाठी ललिता गुप्ता, कल्पना पंचवाटकर यांनी परिश्रम घेतले.
मलकापूर: मलकापूर येथे लोकमत सखी मंच आणि श्री गौशालाच्यावतीने सर्मपण लॉन येथे तीन बॅचेसमध्ये किरीट पोपट, श्रद्धा चोपडे, जयश्री जनसारी यांनी महिलांना गरबा दांडियाचे धडे दिले.
जळगाव जामोद : येथील प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रशिक्षिका आरती पलन, माजी नगराध्यक्ष स्वातीताई वाकेकर, युनिट प्रमुख वंदनाताई कांडलकर, नगरसेविका लता तायडे, नगरसेविका सविताताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये स्मिता पवार, दीपाली लेडस्कार, अनसूया अवचार, सविता देशमुख, संध्या गायगोळ, तृप्ती राजपूत, सरिता देशमुख, शरयु मानसकर, अर्चना ठोंबरे, लता तायडे, स्वाती वाकेकर, मीनल पाटील, युगा देशमुख, अश्विनी जामोदकर, माधुरी राणे, बबीता राठोड, हर्षदा वाघ, दिशा देशमुख, आरती उमाळे, सुलभा मानसकर, उषा मानकर, नीता सातव, नीलिमा वानखडे, नंदा सातव, प्रतिभा हिरळकर, कविता गाभणे, दीपाली कावरे, शीतल कावरे, जयश्री राठी, भारती चांडक, कीर्ती सातव, सीमा राठी, मनिषा राठी, विद्या घुटे, शैलजा पवार, सुनिता भालतडक, विद्या चोपडे, सीमा बंबटकार, संगीता रत्नपारखी, शुभांगी रत्नपारखी, आशा भागवत, अनिता वाघ, मंजुषा वानखडे, विद्या मोरे, विशाखा धुंदाळे, मनिषा बगाडे, विजया राठी, मीतल इंगळे, रोशनी बराटे या महिलांनी सहभाग घेतला आहे. संचालन व आभार स्मिता पवार यांनी मानले.