रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत अपघात विमा जनजागृती अभियानास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:17 AM2021-02-07T04:17:39+5:302021-02-07T04:17:39+5:30
या अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत दोन लाखांचा विमा काढून मिळताे. स्टेट बँकेत एक रुपये फिक्स डिपॉझीट केले, ...
या अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत दोन लाखांचा विमा काढून मिळताे. स्टेट बँकेत एक रुपये फिक्स डिपॉझीट केले, तर जीवनभर दोन लाखांच्या अपघात विम्याचे कवच मिळू शकते. त्यासोबतच लोकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा याेजना ज्याचे प्रीमियम ३३० आहे. अंतर्गत नैसर्गिक मृत्यू झाल्यास अर्जदारास दोन लाखांच्या विम्याचे कवच मिळते. कार्यक्रमाचे उद्घाटन अकोट पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी केले. यावेळी स्टेट बँकेचे शाखाधिकारी श्रीरंग कुलकर्णी, सहाय्यक अधिकारी रोहित अंबुलकर, रोटरीचे माजी अध्यक्ष नंदकिशोर शेगोकार, जेसीआय अकोटचे अध्यक्ष नितीन शेगोकार, रोटरीचे संजय बोरोडे व अनंतराव काळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी गजानन तायडे, सुशील तायडे, पोलीस कर्मचारी सुनील नागे, आशिष नांदोकार, गणेश फोकमारे, गोपाल निमकर्डे, शेतकरी मोटर्सचे कर्मचारी अजिंक्य नाथे, वैभव काळे, श्रीकृष्ण नाथे, विनोद कडू, अजिंक्य तेलगोटे, कल्पेश गुलाहे यांनी परिश्रम घेतले.
फोटो: