स्काऊट गाईड नोंदणी अभियानास अकोटात प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:18 AM2021-01-23T04:18:57+5:302021-01-23T04:18:57+5:30
शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. वैशाली ठग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये स्काऊट, गाईड, कब, बुलबुल युनिट नोंदणी ...
शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. वैशाली ठग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये स्काऊट, गाईड, कब, बुलबुल युनिट नोंदणी व्हावी, या उद्देशाने दि २० ते २९ जानेवारी या कालावधीत विशेष नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत येथील बीआरसी कार्यालयात शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी गजानन सावरकर, स्काऊटचे सहाय्यक जिल्हा आयुक्त विजय जितकर, अकोला स्काऊट गाईड विभागाचे रमेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गटशिक्षणाधिकारी हाडोळे यांच्या मार्गदर्शनात १०० टक्के नोंदणी करण्याचा मानस विस्तार अधिकारी सावरकर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला तालुक्यातील बहुतांश शाळांच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित राहून नोंदणीस सहकार्य केले. स्काऊट गाईड चळवळ ही सुसंस्कारित नागरिक घडवणारी, शालेय विद्यार्थ्यांना विश्वबंधुत्वाची, सर्वधर्म समभागाची शिकवण देणारी जागतिक चळवळ आहे, असे मत विजय जितकर यांनी व्यक्त केले. (फोटो)