निर्बंधांमुळे ‘एसटी’चे उत्पन्न निम्म्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:14 AM2021-07-01T04:14:30+5:302021-07-01T04:14:30+5:30
मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक विस्कळीत होत आहे. कोरोनाचा वारंवार उद्रेक होत असल्याने प्रवासीसंख्या कमी होत ...
मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक विस्कळीत होत आहे. कोरोनाचा वारंवार उद्रेक होत असल्याने प्रवासीसंख्या कमी होत असून, महामंडळाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एसटीची प्रवासी वाहतूक सेवा केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू होती. यामध्ये डिझल खर्चही निघत नव्हता. दुसरी लाट ओसरत असल्याने पुन्हा अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे बससेवा पूर्ववत होत होती. प्रवासीसंख्याही दिवसेंदिवस वाढत होती; परंतु तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सोमवारपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासीसंख्याही घटली. याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला. शहरातील आगार क्रमांक २चे दररोजचे उत्पन्न चार लाख ७५ हजार रुपयांपर्यंत होते; मात्र आता ते दोन लाख १५ हजार रुपयांच्या जवळपास आले आहे.
आगारातून सुरू असलेल्या बसेस
२२
दररोज होत असलेल्या फेऱ्या
८८-९०
शिवशाहीला प्रवासी मिळेना!
प्रवासीसंख्या वाढल्याने अकोला आगारातून लांब पल्ल्यासाठी शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला या बसेसना प्रतिसाद मिळाला; परंतु पुन्हा निर्बंध लागल्याने या बसेसना प्रवासी मिळणेही अवघड झाले आहे.