निर्बंधात सूट, बेफिकिरी कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:14 AM2021-06-21T04:14:47+5:302021-06-21T04:14:47+5:30
वाहतुकीची कोंडी अकोला : मध्यवर्ती बस स्थानक परिसरात उड्डाण पुलासह अंडरपासचे निर्माणकार्य सुरू आहे. सोबतच या मार्गावर वाहनांची वर्दळही ...
वाहतुकीची कोंडी
अकोला : मध्यवर्ती बस स्थानक परिसरात उड्डाण पुलासह अंडरपासचे निर्माणकार्य सुरू आहे. सोबतच या मार्गावर वाहनांची वर्दळही कायम असल्याने येथे दररोज वाहतुकीची कोंडी होते. दुपारच्या सुमारास मोठी वाहने देखील येथूनच जात असल्याने परिसरात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्याची दुरवस्था, वाहनचालक त्रस्त
अकोला : डाबकी रोडमार्गे गायगावकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, मार्गावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागतो. धुळीमुळे मार्गावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
डाबकीरोड उड्डाणपुलाचे काम थंडबस्त्यात
अकोला : डाबकी रोड रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे निर्माण कार्य मागील दोन ते तीन वर्षांपासून सुरू आहे. अद्यापही या मार्गाचे निर्माण कार्य पूर्ण झालेले नाही. असाच काहीसा प्रकार न्यू तापडियानगर परिसरातील उड्डाणपुलेच्या बाबतीत दिसून येतो. त्यामुळे या दोन्ही भागात वाहनचालकांना अजूनही रेल्वेगेट उघडण्याची प्रतीक्षा करावी लागते.
डासांचा प्रादुर्भाव वाढला, फवारणीची गरज
अकोला : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक भागात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्तीही वाढू लागली आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढला आहे. हा धोका टाळण्यासाठी फवारणी करण्याची गरज आहे.