विधानसभा निवडणुकीवर होणारा परिणाम

By admin | Published: May 18, 2014 12:30 AM2014-05-18T00:30:35+5:302014-05-18T00:30:55+5:30

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपने सलग तिसर्‍यांदा वर्चस्व मिळविले. त्याचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीवरही पडणार आहेत.

The result of the assembly elections | विधानसभा निवडणुकीवर होणारा परिणाम

विधानसभा निवडणुकीवर होणारा परिणाम

Next

विधानसभा निवडणुकीवर होणारा परिणाम अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपने सलग तिसर्‍यांदा वर्चस्व मिळविले. विजयाची हॅट्ट्रिक साधताना भाजपने या मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी मिळविली. त्याचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीवरही पडणार आहेत. सहा पैकी ३ मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे आमदार आहेत तर अकोला पूर्व आणि बाळापूर मतदारसंघात भारिप-बमसंचे आमदार आहेत. रिसोड हा एकच मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यामुळे त्याबळावर विकासाचे स्वप्न मतदारांना दाखवून विधानसभा निवडणुकीत मतांचा जोगवा मागितला जाईल.

**फायदा की तोटा?

* आकोट मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. येथे भाजपला मिळालेल्या आघाडीचा विधानसभेत शिवसेनेलाही फायदा होईल.

* भारिपचे प्रकाश आंबेडकर दुसर्‍या स्थानावर राहिल्याने बाळापूर मतदारसंघात विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांना त्याचा तोटा सहन करावा लागू शकतो.

* अकोला पश्‍चिम हा भाजपचा गड आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

* अकोला पश्‍चिम हा भाजपचा गड आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

* भारिपचा गड समजल्या जाणार्‍या अकोला पूर्वमध्ये भाजपची मुसंडी विद्यमान आमदार हरिदास भदे यांना अडचणीत आणणारी ठरणार आहे.

* मूर्तिजापूरमध्ये भाजपला मिळालेली मोठी आघाडी ही विधानसभेच्या दृष्टिकोनातून आमदार हरीश पिंपळे यांच्यासाठी फायदेशीर ठरणारी आहे.

* लोकसभेत भाजपला आघाडी मिळवून देणार्‍या रिसोड विधानसभा मतदारसंघात विद्यमान काँग्रेस आमदाराला नव्याने विचार करावा लागेल.

Web Title: The result of the assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.