सेवानवृत्तांचे पेन्शन रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 08:15 PM2017-10-13T20:15:32+5:302017-10-13T20:50:55+5:30
विविध आस्थापनांमधून सेवानवृत्त झाल्यानंतर ईपीएस ९५ अंतर्गत सेवानवृत्ती वेतन घेणार्या अनेक नवृत्त कर्मचार्यांचे पेन्शन गत पाच महिन्यांपासून रखडले आहे. दिवाळीपूर्वी सर्वांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा करावी, अशी मागणी कर्मचारी नवृत्ती वेतन योजना समन्वय समितीद्वारे करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विविध आस्थापनांमधून सेवानवृत्त झाल्यानंतर ईपीएस ९५ अंतर्गत सेवानवृत्ती वेतन घेणार्या अनेक नवृत्त कर्मचार्यांचे पेन्शन गत पाच महिन्यांपासून रखडले आहे. दिवाळीपूर्वी सर्वांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा करावी, अशी मागणी कर्मचारी नवृत्ती वेतन योजना समन्वय समितीद्वारे करण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या आयुक्तांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय, अकोला अंतर्गत अकोला, अमरावती, बुलडाणा व यवतमाळ असे पाच जिल्हय़ांचा अंतर्भाव होतो. या पाचही जिल्हय़ातील ईपीएस ९५ योजनेंतर्गत शेकडो सेवानवृत्त कर्मचार्यांचे पेन्शन गत पाच महिन्यांपासून रखडलेले आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आल्यानंतर अनेक सेवानवृत्त कर्मचार्यांनी तशी दुरुस्तीही करून दिली. अधिकार्यांची भेट घेतली असता, लवकरच खात्यात पैसे जमा होतील,असे आश्वासन देण्यात आले; परंतु अद्यापपर्यंत पेन्शनची रक्कम जमा झाली नाही. यवतमाळ जिल्हय़ातील दिग्रस तालुक्यातील ७0 ते ८0 ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शन रखडलेले असल्यामुळे त्यांनी अकोला येथील कार्यालयात अनेक चकरा मारल्या; परंतु फायदा झाला नाही. आता दिवाळी तोंडावर आली असताना सहानुभूतीपूर्वक विचार करून पेन्शनची रक्कम खात्यात जमा करावी, अशी मागणी या कर्मचार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.