घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी सेवानवृत्त पोलीस कर्मचार्यास शिक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 02:32 AM2018-02-18T02:32:05+5:302018-02-18T02:32:20+5:30
अकोला : खडकी परिसरातील श्रद्धा कॉलनी येथे पाण्याच्या टाकीमधील पाणी गळत असल्याच्या कारणावरून शेजारच्या महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याप्रकरणी सेवानवृत्त पोलीस कर्मचार्यास प्रथमश्रेणी न्यायदंडाधिारी यांच्या न्यायालयाने शनिवारी दोन महिन्यांची शिक्षा सुनावली. प्रकाश सीताराम महाजन असे आरोपीचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

श्रद्धा कॉलनी येथील रहिवासी तसेच सेवानवृत्त एएसआय प्रकाश सीताराम महाजन याने पाणी लिकेज असल्याच्या कारणावरून १३ मार्च २0१३ रोजी शेजारी रहिवासी असलेल्या महिलेच्या घरात घुसून तिला बेदम मारहाण केली होती. त्यावेळी हा वाद सोडण्यासाठी गेलेल्या महिलेलाही शिवीगाळ करीत तिचा विनयभंग प्रकाश महाजन याने केला होता.
याप्रकरणी दोन्ही महिलांनी खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकाश महाजन याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ४५२ नुसार गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम. डी. ननावरे यांच्या न्यायालयाने सात साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी प्रकाश महाजन याला दोन महिन्यांची शिक्षा सुनावली. यासोबतच पाच हजार रुपयांचा दंडही आरोपीस ठोठावण्यात आला.
-