प्रिंप्री जैनपुर येथे पार पडली रिव्हर्स ट्रॅक्टर-ट्राॅली स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 04:25 PM2019-02-11T16:25:42+5:302019-02-11T16:26:15+5:30
अकोटः शेतकरी बांधव व ट्रॅक्टर चालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, मातीशी घट्ट नाळ जुडलेला ट्रॅक्टर याकरिता मारोती महाराज संस्थान कडून रिव्हर्स ट्रॅक्टर ट्राॅली ही अनोखी स्पर्धा अकोट तालुक्यातील प्रिप्री खु.येथे पार पडली.
अकोटः शेतकरी बांधव व ट्रॅक्टर चालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, मातीशी घट्ट नाळ जुडलेला ट्रॅक्टर याकरिता मारोती महाराज संस्थान कडून रिव्हर्स ट्रॅक्टर ट्राॅली ही अनोखी स्पर्धा अकोट तालुक्यातील प्रिप्री खु.येथे पार पडली.
सातपुडा पायथ्याशी कोणताही गाजावाजा न करता गावकरी लोकसहभागातून अशा स्पर्धा घेतात. शेतकरी बैलबंडी वरून ट्रॅक्टर वर आला. गावागावात ट्रॅक्टरची वाढती संख्या आधीच गाव व शेतातील रस्ते अंरूद आहेत.अनेकदा ट्रक्टर सोबत ट्राली असताना मागे रीव्हर्स घेत असताना अपघात घडतात.त्यामुळे अशा स्पर्धातुन चालकांचे नैपुण्य दिसुन येते. अशा शेतकरी बांधवाचे बैलाचा शंकरपट बंद झाल्यागत असतांना ट्रक्टर सोबत ट्राली रीव्हर्स स्पर्धा काहीतरी शिकवण देऊन जात आहेत.अशा स्पर्धेचे उदघाटन जि. प. सदस्य बाळासाहेब बोंद्रे , अ.भा.छावा संघटना जिल्हाध्यक्ष रणजित पाटिल काळे, शिवसेना गटनेते मनिष कराळे यांची उपस्थिती होती. याक् स्पर्धेत सहभागी चालकांनी आपले कौशल्य दाखविले. स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळा अस्थिरोग तज्ञ अभय पाटिल यांची उपस्थिती होती. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस ११ हजार १११ रुपये दत्ता पाकधाने,व्दितीय बक्षिस ७ हजार१११ रुपये गणेशराव पवार तर तृतीय बक्षीस अमित ढोले यांना प्रदान करण्यात आले.यावेळी प्रविण ठाकरे, साहेबराव भगत, बाळकृष्ण बोंद्रे, दिपक भगत, संदिप मानकर,दिपक भगत,शांतारामजी मानकर, गोवर्धन बानेरकर यांची उपस्थिती होती. या स्पर्धाचे आयोजन प्रिंप्री जैनपुर गावकरी मंडळीने केले होते, अशी माहीती ज्ञानेश्वर मानकर यांनी दिली.