बोर्डी येथे कोरोना कामाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:34+5:302021-05-21T04:19:34+5:30

गावात ४० टक्के ४५ वर्षांवरील नागरिक लसीपासून वंचित आहेत. बोर्डी गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याअनुषंगाने ...

Review of Corona's work at Bordi | बोर्डी येथे कोरोना कामाचा आढावा

बोर्डी येथे कोरोना कामाचा आढावा

Next

गावात ४० टक्के ४५ वर्षांवरील नागरिक लसीपासून वंचित आहेत. बोर्डी गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याअनुषंगाने खबरदारी व काळजी घेणे गरजेचे आहे, अशा सूचना तहसीलदार मडके यांनी दिल्या.

यावेळी जि. प. सदस्य प्रकाश आतकड, सरपंच स्वाती गोपाल चंदन, ग्रामसेवक मोहोकार, तलाठी राजेश खामकर, कृषी सहायक ईश्वर बैरागी, डॉ. संतोष बुथ उपस्थित होते.

गावा-गावात कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करा

अकोट : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, ग्रामपंचायत स्तरावर कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष किंवा कोरोना सेंटर उभारण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आपल्या स्तरावरून आदेश द्यावेत, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे बुधवारी केली.

गर्दी टाळण्याकरिता उपाययोजना करण्याचे एसडीओंचे आदेश

अकोट : तालुक्यातील सर्व शासकीय, खासगी बँका व पोस्ट ऑफिसमध्ये कोरोना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली व लीड बँक मॅनेजर शतरनिया यांच्या उपस्थितीत नगरपरिषद सभागृहात १८ मे रोजी सभा घेण्यात आली. सभेमध्ये बँक, पोस्ट व्यवस्थापक यांना सूचना देण्यात आल्या. त्यामध्ये बँक, पोस्टामध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करावी, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सर्व बीसी पॉईंट, बँकिंग पॉईंट सुरू ठेवावेत, सर्व बँकेच्या एटीएममध्ये पुरेशी रक्कम टाकावी व बंद असलेली एटीएम सुरू करावीत, आदी सूचना दिल्या.

सभेला बँक व्यवस्थापक, पोस्ट व्यवस्थापक, नगरपरिषदेचे चंदन चंडालिया, उमेश मांडळे, तन्वीर सिद्धांत वानखडे उपस्थित होते.

Web Title: Review of Corona's work at Bordi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.