मतमोजणी तयारीचा आढावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:17 AM2021-01-18T04:17:18+5:302021-01-18T04:17:18+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज होणार गर्दी! अकोला: अकोला तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी सोमवार, १८ जानेवारी रोजी सकाळी ...
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज होणार गर्दी!
अकोला: अकोला तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी सोमवार, १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय धान्य गोदामात सुरू होणार आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उमेदवार आणि समर्थकांची गर्दी होणार आहे.
जि.प. विभागप्रमुखांची आज बैठक!
अकोला: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार सोमवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेतील विविध विभागप्रमुखांची बैठक घेणार आहेत. योजनांची अंमलबजावणी आणि विकासकामांचा विभागनिहाय आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी या साप्ताहिक बैठकीत घेणार आहे.
२९ गावांत हातपंप दुरुस्तीची कामे!
अकोला: जिल्ह्यातील २९ गावांत नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्याची कामे सध्या सुरू असून, हातपंपाच्या दुरुस्तीचीही कामे लवकरच पूर्ण होणार आहेत, असे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा यांत्रिकी विभागाचे उपअभियंता एस.बी. मुंढे यांनी सांगीतले.
कार्यकारी अभियंतापदाचा प्रभार अनिस खान यांच्याकडे!
अकोला: जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पद १ जानेवारीपासून रिक्त आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १३ जानेवारी रोजी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंतापदाचा अतिरिक्त प्रभार या विभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता अनिस खान यांच्याकडे देण्यात आला आहे.
आराखडे प्रलंबित!
अकोला: जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या कालावधीतील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील पंचायत समित्यांकडून तालुकानिहाय आराखडे अद्याप जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले नाही. आराखडे प्रलंबित असल्याने, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील पाणीटंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याची प्रक्रिया रखडली आहे.