कर्जमाफी अर्जांचा आढावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:14 AM2017-10-14T02:14:45+5:302017-10-14T02:15:30+5:30

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांची पडताळणी चावडी वाचन कार्यक्रमात करण्यात आली असून,  पडताळणीतील माहितीची उजळणी तालुका स्तरावर करण्यात येत आहे. त्यामध्ये कर्जदार शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याच्या कामाचा आढावा घेण्यात येत आहे.

Review of debt waiver applications! | कर्जमाफी अर्जांचा आढावा!

कर्जमाफी अर्जांचा आढावा!

Next
ठळक मुद्देशेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम वेगात अकोला, बाळापूर, पातूर तालुक्यातील कामाचा आढावा!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांची पडताळणी चावडी वाचन कार्यक्रमात करण्यात आली असून,  पडताळणीतील माहितीची उजळणी तालुका स्तरावर करण्यात येत आहे. त्यामध्ये कर्जदार शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याच्या कामाचा आढावा घेण्यात येत आहे.
सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्याचे काम गत २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ५४३ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले.  त्यानंतर जिल्ह्यात कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या गावनिहाय याद्यांचे चावडी वाचन करण्यात आले. त्यामध्ये कर्जमाफीच्या अर्जांतील माहितीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीतील माहितीच्या आधारे कर्जमाफीच्या अर्जांची उजळणी जिल्ह्यातील तालुका स्तरावर करण्यात येत असून, त्यामध्ये थकबाकीदार शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याच्या कामांचा आढावा घेण्यात येत आहे.


अकोला, बाळापूर, पातूर तालुक्यातील कामाचा आढावा !
कर्जमाफी योजनेंतर्गत अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यात कर्जमाफीच्या अर्जांचे चावडी वाचन, त्यामध्ये घेण्यात आलेली माहिती आणि थकबाकीदार शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याच्या कामाचा आढावा अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी शुक्रवारी घेतला. यावेळी पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्‍वर पुरी, बाळापूरचे तहसीलदार दीपक पुंडे यांच्यासह संबंधित सहायक निबंधक (सहकारी संस्था) व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
कर्जमाफी योजनेंतर्गत ऑनलाइन भरलेल्या अर्जांच्या चावडी वाचनानंतर शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम करण्यात येत आहेत. त्यामध्ये पातूर व बाळापूर तालुक्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, अकोला तालुक्यातील शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम अद्याप अपूर्ण असून, ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

Web Title: Review of debt waiver applications!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती