जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:18 AM2021-09-13T04:18:34+5:302021-09-13T04:18:34+5:30
पावसाळ्याच्या दिवसात साथरोग नियंत्रणात राहावे, यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर, पाण्याचे निर्जंतुकीकरण, तुंबलेल्या नाल्या वाहत्या करणे, पाण्याने साचलेले डबके भरून ...
पावसाळ्याच्या दिवसात साथरोग नियंत्रणात राहावे, यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर, पाण्याचे निर्जंतुकीकरण, तुंबलेल्या नाल्या वाहत्या करणे, पाण्याने साचलेले डबके भरून काढणे आदी कामांबाबत आरोग्य सेवकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींच्या लक्षात आणून देणे, मानवविकास मिशन अंतर्गत कॅम्पमध्ये गरोदर महिला, बालक आदींची तज्ज्ञांकडून प्राथमिक आरोग्य स्तरावर तपासणी करणे, सोनोग्राफी करणे, जननीसुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना लाभार्थींचे बँक खाते काढणे तसेच आधार कार्ड अद्ययावत करणे व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी तथा पातूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव यांनी सांगितले.
या आढावा बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव, भावना हाडोळे, डॉक्टर शशिकांत पवार, डॉ. आदिनाथ महानकर (जिल्हा हिवताप अधिकारी), जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गोळे, जिल्हा साथरोग अधिकारी मानकर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग अधिकारी डॉ. बाबर, डॉ. प्रीती कावडकर, कार्यक्रम व्यवस्थापक देशमुख यांच्यासह पातूर, बाळापूर तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, आरोग्य पर्यवेक्षक गटप्रवर्तक, आरोग्य सेवक, सेविकांची उपस्थिती होती.
110921\5157img_20210908_141525.jpg
आढावा