खरिप हंगाम तयारीचा आढावा

By admin | Published: May 20, 2014 12:42 AM2014-05-20T00:42:24+5:302014-05-20T01:15:22+5:30

खरिप हंगामाच्या पृष्ठभूमीवर कृषी विभागाच्या तयारीचा अकोला जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घेतला.

Review of Kharif season preparation | खरिप हंगाम तयारीचा आढावा

खरिप हंगाम तयारीचा आढावा

Next

अकोला : खरिप हंगामाच्या पृष्ठभूमीवर कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या तयारीचा आढावा सोमवारी जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. 
यावर्षीचा खरिप हंगाम पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खरिप पेरणीचे अपेक्षित क्षेत्र, पेरणीसाठी लागणारे बियाणे व खतांची मागणी आणि त्या तुलनेत उपलब्ध बियाणे व खत पुरवठ्याची स्थिती, यासंदर्भात जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन आढावा घेतला. तसेच बियाणे आणि खतांच्या विक्रीत काळाबाजार होणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिंदे यांनी या बैठकीत दिले. आढावा बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांच्यासह कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

Web Title: Review of Kharif season preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.