पाणीटंचाईचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:17 AM2021-04-14T04:17:17+5:302021-04-14T04:17:17+5:30
नियमांचे उल्लंघन, २४ हजार दंड वसूल अकोला: लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करून, मनपा प्रशासनाने २३ हजार ...
नियमांचे उल्लंघन, २४ हजार दंड वसूल
अकोला: लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करून, मनपा प्रशासनाने २३ हजार ९०० रुपये दंड वसूल केला. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, नागरिक अद्यापही गंभीर नाहीत. विनामास्क फिरणे, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, जमाव करणे आदी उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. सोमवारी ६६ जणांविरुद्ध कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.
दिव्यांग सोशल फाउंडेशनचा लोकार्पण सोहळा
अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी युट्यूब चॅनलची निर्मिती प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. चॅनलचे उद्घाटन १३ एप्रिल रोजी करण्यात आले. ऑनलाइन कार्यक्रमाला प्रसाद झाडे, श्रीकांत कोरडे, अनामिका देशपांडे, हिमांशू निमकर्डे, राजश्री पाठक, विशाल भोजने उपस्थित होते. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिव्यांगासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य व नोकरीच्या संधी आदी माहिती देण्यात येणार आहे.
शिवणीत भीम जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा
अकोला: महामानव, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्राट अशोक ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण जगताप यांनी शिवणी येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहेत. स्पर्धेत बौद्ध उपासक, उपासिका व नागरिकांनी सहभागी व्हावे. रांगोळीच्या माध्यमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांना मानवंदना देण्यात येणार आहे.
राऊतवाडीत वाहतूक विस्कळीत
अकोला : राऊतवाडी, जठारपेठ चौक आणि उमरी रोडवर भाजी विक्रेत्यांसह इतर किरकोळ व्यावसायिकांनी अतिक्रमण थाटल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने अनेकदा येथील अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला, परंतु भाजी विक्रेत मनपा प्रशासनाच्या कारवाईलाही जुमानत नाहीत. रस्त्यावर भाजीविक्रीच्या हातगाड्या उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. त्यामुळे दररोज राऊतवाडी चौकात वाहतूक विस्कळीत होत आहे.